Rohit Pawar Viral Video: आवाज खाली! शहाणपणा करायचा नाही!! पोलीस स्टेशनमध्ये ड्रामा

Rohit Pawar Video: रात्री उशिरा नितीन देशमुख यांना भेटण्याचा राशपचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न केला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर गुरुवारी मारहाणीची अत्यंत निंदनीय घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली असून हाणामारी करणाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत विधानभवनातच पकडून ठेवण्यात आलं होतं. यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे सोपवण्यात आले होते.

( नक्की वाचा: 'विधानभवनात आमदारांचे खून पडले तर...' राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया )

पोलीस स्टेशनमध्ये घडला प्रकार

पोलिसांनी पडळकर समर्थक सर्जेराव बबन टकले आणि आव्हाड समर्थक नितीन हिंदुराव देशमुख या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा नितीन देशमुख यांना भेटण्याचा राशपचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न केला होता. यावेळी रोहित पवार यांनी पोलिसांना पोलीस स्टेशनमध्येच इशारा दिला.

Advertisement

रोहित पवार समर्थकांनी केला व्हिडीओ व्हायरल

नेमकं काय झालं ?

नितीन देशमुख यांना पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या गाडीसमोर झोपून ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी खेचून काढत गाडीला रस्ता करून दिला होता. यानंतर नितीन देशमुख यांना कोणत्या पोलीस ठाण्यात नेले आहे हे रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाने केलेली कृती रोहित पवारांना आवडली नव्हती. यावर त्यांनी त्या पीएसआयला सुनावत म्हटले की, "आवाज खाली!! आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला.शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल, तर बोलायचं नाही. कळलं का चला व्हा तिकडे. आमदाराला हात लावायचा नाही."

Advertisement