RSS म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काशी येथील ज्ञानवापी आणि मथुरेतील कृष्णजन्मभूमीबाबत एक नवीन घोषणा केली आहे. सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी स्वयंसेवकांना काशी आणि मथुरेमध्ये सुरु असलेल्या आंदोलनात सक्रिय भूमिका बजावण्याची परवानगी दिल्याचे वृत्त आहे. एका कन्नड मासिकाला दिलेल्या मुलाखतीत होसबळे यांनी यावर भाष्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कन्नड मासिक विक्रमशी बोलताना होसबळे म्हणाले की, '1984 मध्ये विश्व हिंदू परिषद, संत आणि साधूंनी अयोध्या, काशी आणि मथुरा या तीन मंदिरांबद्दल भाष्य केले होते. त्यामुळे जर स्वयंसेवकांचा गट काशी आणि मथुरा मंदिरांच्या आंदोलनात सहभागी होऊ इच्छित असेल तर आम्ही त्यांना थांबवणार नाही. दत्तात्रय होसाबळे यांनी मशिदींबाबत मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित करणे टाळावे, तसेच समाजातील मतभेद टाळावेत, असा सल्ला देखील दिला आहे.
(नक्की वाचा- Suresh Dhas : "बिश्नोई गँगद्वारे माझ्या हत्येचा डाव होता", सुरेश धसांचा गंभीर आरोप)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देखील अलिकडेच म्हटले होते की, "प्रत्येक मशिदीत मंदिराचा शोध थांबवला पाहिजे. मशिदीत मंदिर शोधण्याचे काम हिंदू समुदायाचे नेते बनण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडून केले जात आहे. अयोध्येतील राम मंदिर, काशीतील विश्वनाथ मंदिर आणि मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुद्द्याला आरएसएसने नेहमीच पाठिंबा दिला आहे. अयोध्या आंदोलनादरम्यान विश्व हिंदू परिषदेने मुस्लीम पक्षाला असेही सांगितले होते की जर त्यांनी अयोध्या, काशी आणि मथुरा ही वादग्रस्त स्थळे हिंदूंना सोपवली तर देशातील इतर कोणत्याही मशिदीवर कोणताही दावा केला जाणार नाही. विश्व हिंदू परिषदेची ही मागणी मान्य करण्यास मुस्लिम समुदायाने नकार दिला होता."
भाषांचे जतने केले पाहिजे- होसबळे
भाषांचे रक्षण करण्याकडेही लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन दत्तात्रय होसबळे यांनी केले. भारतीय भाषांचे जतन करण्याचे आणि भारतीय भाषांमध्ये शिक्षण घेतलेल्या लोकांना रोजगार मिळू शकेल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या सर्व भाषांमध्ये बरेच साहित्यिक काम झाले आहे. इंग्रजीची ओढ प्रामुख्याने व्यावहारिक कारणांमुळे आहे. त्यामुळे असे आर्थिक मॉडेल तयार केले पाहिजे, जिथे भारतीय भाषांमध्ये शिक्षण घेतलेल्या लोकांना रोजगार मिळू शकेल.
(नक्की वाचा- Walmik Karad : बीड कारागृहात वाल्मीकच बॉस? 'ते' कैदी बाहेर येताच धडाधड बोलले)
अनेकांना बोलीभाषा शिकण्यात काहीच अडचण येत नाही. ज्यांना रोजगार हवा आहे त्यांनी त्या राज्याची भाषा शिकली पाहिजे. राजकारण आणि विरोधाच्या नावाखाली जेव्हा भाषा लादण्याचा मुद्दा बनवला जातो तेव्हा समस्या उद्भवतात. भाषिक विविधता असूनही भारत हजारो वर्षांपासून एकसंध नाही? असं वाटतंय की आज आपण आपण भाषेला एक समस्या बनवलं आहे, अशी चिंता देखील दत्तात्रय होसबळे यांनी व्यक्त केली.