जाहिरात

Suresh Dhas : "बिश्नोई गँगद्वारे माझ्या हत्येचा डाव होता", सुरेश धसांचा गंभीर आरोप

Suresh Dhas : सुरेश धस यांनी याबाबत सांगितलं की, सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकणातून माझ्या हत्येचा डाव होता. यासाठी बिश्नोई गँगची मदत घेतली जाणार होती.

Suresh Dhas : "बिश्नोई गँगद्वारे माझ्या हत्येचा डाव होता", सुरेश धसांचा गंभीर आरोप

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण भाजप आमदार सुरेश धस यांनी लावून धरलं. दरम्यान सुरेश धस यांनी वाल्मिक कराड आणि गँगवर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवरही त्यांनी हल्लाबोल केला. मात्र या सर्व घडामोडींदरम्यान आपल्याला जीवे मारण्याचा देखील कट होता, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणामुळे आमदार सुरेश धस देखील अडचणीत सापडले होते. मारहाण, प्राण्यांची तस्करी असे गंभीर आरोप खोक्यावर होते. मात्र त्याच्यावर सुरेश धस यांचा वरद हस्त असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. मात्र या प्रकरणाद्वारे आपली हत्या घडवण्याचा कट होता असा आरोप धस यांनी केला आहे. एका मराठी वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे आरोप केले.  

(नक्की वाचा-  Rain Alert : ठाणे, पुण्यासह या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट)

सुरेश धस यांनी याबाबत सांगितलं की, सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकणातून माझ्या हत्येचा डाव होता. यासाठी बिश्नोई गँगची मदत घेतली जाणार होती. खोक्याने सुरेश धस यांना हरणाचं मांस कसं पुरवलं, हे पटवून देण्याचा बिश्नोई समाजाला प्रयत्न करण्यात आला. यासाठी बिश्नोई समाजाच्या काही लोकांना खास विमानाने मुंबईत आणण्यात आले होते. 

बिश्नोई समाजात मला व्हिलन करण्याचा काहींचा डाव होता. बिश्नोई समाजात हरणांना देवासमान मानतात. त्यामुळे सुरेश धस हरणाचं मांस खातो हे बिश्नोई समाजापर्यंत पोहोचवायचं होतं. जेणेकरून लॉरेन्स बिश्नोई माझी हत्या करेल, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला. 

(नक्की वाचा- Walmik Karad : बीड कारागृहात वाल्मीकच बॉस? 'ते' कैदी बाहेर येताच धडाधड बोलले)

परळीचे मुंडे माझ्या मतदारसंघात आले आणि सुरेश धसांना खोक्याने हरणाचं मास पुरवलं असं सांगितलं. मात्र 16 वर्षे मी माळकरी राहिलो आहे. मी प्राणी, पशु-पक्षी प्रिय आहे. हरणाच्या मासापर्यंत मी कधीच गेलो नाही. माझ्यावर एवढी वाईच वेळ अजून आलेली नाही. असं म्हणत सुरेश धस यांनी खोक्याने हरणाचं मांस पुरवल्याचा दावा खोडून काढला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: