साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! आता शिर्डीत राम-कृष्ण हरीचाही जयघोष; 110 वर्षांचा इतिहास पुन्हा जीवंत होणार

शिर्डीच्या साईबाबांच्या हयातीतील मुर्तींचा वनवास आता संपणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Shirdi News : शिर्डीच्या साईबाबांच्या हयातीतील मुर्तींचा वनवास आता संपणार आहे. साईबाबांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी साईसंस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या ऐतिहासिक मूर्तींसाठी आता लेंडी बाग परिसरात स्वतंत्र मंदिरं उभारण्यात येणार आहेत. 

लेंडीबाग परिसरात दोन स्वतंत्र मंदिराची उभारणी...

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या वस्तुसंग्रहालयात साधारण 110 वर्षापासून जतन करून ठेवलेल्या श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या ऐतिहासिक मूर्ती आता भाविकांना स्वतंत्र मंदिरात दर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत. यासाठी संस्थानने लेंडीबाग परिसरात दोन स्वतंत्र मंदिरे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Advertisement

साईभक्तांसाठी दुहेरी योग...

साईबाबा देहधारी असताना नागपूरचे गोपाळराव बुटी यांनी शिर्डीत दगडी वाडा, म्हणजेच आजचे समाधी मंदिर, त्याच काळात साईबाबांच्या हस्ते श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. यासाठी या मूर्ती नागपूरहून शिर्डीत आणण्यातही आल्या होत्या. 
मात्र, त्याआधीच साईबाबांचे महापरिनिर्वाण झाल्याने भाविकांच्या आग्रहास्तव बुटी वाड्यातच साईबाबांचे पवित्र समाधीस्थळ उभारण्यात आले. त्यामुळे या मूर्तींची नियोजित प्रतिष्ठापना होऊ शकली नाही. त्यानंतर गेली अनेक दशके या ऐतिहासिक मूर्ती संस्थानच्या वस्तुसंग्रहालयात सुरक्षित जतन करण्यात आल्या आहेत.

नक्की वाचा - 2 आलिशान वाहन अन् शिर्डीत उडाला गोंधळ; साईबाबांच्या चरणी रुबाब दाखविणाऱ्यांचा पोलिसांनी उतरवला माज

संस्थानाच्या माहितीनुसार, साईबाबांच्या काळाशी जोडलेला हा अमूल्य ऐतिहासिक वारसा जतन करण्याबरोबरच श्रीराम नवमी आणि गोकुळाष्टमी हे उत्सव मंदिर परिसरात अधिक भक्तिभावाने साजरे करता यावेत, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.
 


Topics mentioned in this article