जाहिरात

Shirdi News: साईबाबांना 1 कोटींचा सुवर्ण मुकूट अर्पण, 'या' साईभक्ताची शिर्डीसह देशभरात रंगलीय चर्चा

शिर्डीच्या साईदरबारात श्रद्धा,भक्ती आणि दानशूरतेचं आणखी एक अनोखं उदाहरण पाहायला मिळालं आहे.सोन्याचे दर सातत्याने वाढत असतानाही साईभक्तांच्या श्रद्धेसमोर महागाईचं गणित फिकं पडत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

Shirdi News: साईबाबांना 1 कोटींचा सुवर्ण मुकूट अर्पण, 'या' साईभक्ताची शिर्डीसह देशभरात रंगलीय चर्चा
Shirdi Saibaba Temple Gold Crown Donation

सुनिल दवंगे, प्रतिनिधी

Shirdi Saibaba Temple latest News :  शिर्डीच्या साईदरबारात श्रद्धा,भक्ती आणि दानशूरतेचं आणखी एक अनोखं उदाहरण पाहायला मिळालं आहे.सोन्याचे दर सातत्याने वाढत असतानाही साईभक्तांच्या श्रद्धेसमोर महागाईचं गणित फिकं पडत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.लखनौ येथील साईभक्त गोविंद गोयल यांनी तब्बल एक कोटी रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट साईबाबांना अर्पण केला आहे.

शुक्रवारी मध्यान्ह आरतीदरम्यान गोविंद गोयल आणि त्यांच्या परिवाराने हा सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी समर्पित केला. या सुवर्ण मुकुटाचं वजन जवळपास 782 ग्रॅम असून त्याची किंमत आजच्या बाजार भावाने 1 कोटी 10 लाख रुपये असल्याची माहिती भाविकान दिली.साई मंदिरात विधिवत पूजा आणि आरतीनंतर हा मुकुट अर्पण करण्यात आला.यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांनी देखील या क्षणाचा अनुभव घेतला.तर दानशूर गोयल परिवाराचा साई संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार करत त्यांचे आभार मानले.

दरवर्षी जमा होतं कोट्यवधी रुपयांचं दान

शिर्डी हे जगभरातील साईभक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते.देश-विदेशातून दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात.अनेक भाविक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी रोख रक्कम,सोने-चांदीच्या वस्तू,दागिने तसेच विविध स्वरूपातील दान संस्थानला अर्पण करत असतात. त्यामध्ये आता या एक कोटी रुपये किमतीच्या सुवर्ण मुकुटाची भर पडली आहे.विशेष म्हणजे,गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असतानाही साईभक्तांकडून सोन्याच्या वस्तू दान करण्याचा ओघ कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा >>  Pune News : बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, नागरिकांमध्ये भीतीचं सावट, पुण्यात कुठे सुरु होता संतापजनक प्रकार?

श्रद्धा आणि विश्वासाच्या भावनेतून भाविक साईचरणी आपलं योगदान देत असल्याचं यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झालं आहे. गोविंद गोयल परिवाराने साईबाबांप्रती असलेली आपली निष्ठा आणि भक्ती व्यक्त करत हा सुवर्ण मुकुट अर्पण केला असल्याचं सांगितलं जात आहे.मध्यान्ह आरतीच्या वेळी मुकुट अर्पण झाल्यानंतर मंदिर परिसरात या दानाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती.अनेक भाविकांनी या दानशूरतेचं स्वागत करत साईबाबांवरील श्रद्धा सर्वात मोठी असल्याची भावना व्यक्त केली.

शिर्डीतील साईभक्तीचा जागतिक स्तरावर प्रभाव

दरम्यान,साई संस्थानकडे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे दान जमा होत असते.रोख रक्कम, मौल्यवान धातू, दागिने आणि विविध वस्तूंच्या माध्यमातून भाविक आपली श्रद्धा व्यक्त करत असतात.अशा प्रकारच्या सुवर्णदानामुळे शिर्डीतील साईभक्तीचा जागतिक स्तरावरील प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.एकीकडे वाढती महागाई आणि आर्थिक आव्हाने असताना दुसरीकडे श्रद्धा,भक्ती आणि विश्वासाच्या बळावर भाविक साईचरणी आपलं सर्वस्व अर्पण करत असल्याचं हे उदाहरण पुन्हा एकदा शिर्डीत पाहायला मिळालं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com