
आकाश सावंत, बीड: रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा केला जातो. मात्र 6 जून रोजी होणारा सोहळा रद्द करुन तिथीनुसार शिवराज्याभिषेक करावा, असे विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले होते. संभाजी भिडेंच्या या विधानावरुन शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवराज्याभिषेक सोहळा समिती सदस्य गंगाधर कुटे यांनी त्यांना उत्तर दिले असून कोणी काहीही म्हणो शिवराज्याभिषेक 6 जूनलाच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणालेत गंगाधर काळकुटे?
'6 जूनला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्यानुसार 6 जून रोजी यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. बीड जिल्ह्यातल्या गावागावातून मोठ्या उत्साहाने हजारो लोक शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर जाणार असून जरी कोणी काहीही म्हणत असेल सोहळा रद्द केला पाहिजे किंवा काही.. तरीही लाखोच्या संख्येने शिवभक्त यावर्षी गडावर येणार आहेत,' असे गंगाधर काळकुटे यांनी म्हटले आहे.
तसेच 'भिडे गुरुजी ज्येष्ठ मात्र त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे की काय ? असा प्रश्न शिवभक्तांना पडला आहे. शिवभक्त आणि महाराष्ट्रातील रणरागिणी बांगड्याचा आहेर भिडे गुरुजींना पाठवून या वक्तव्याचा निषेध करतील. वाघ्या कुत्र्याची समाधी हटवायची की नाही हे निरर्थक वाद आहेत," असे म्हणत गंगाधर काळकुटे यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
नक्की वाचा - Solapur Crime : 9 वर्षांच्या चिमुरडीला शेतात पुरलं, मुलीचे वडील चौकशीच्या फेऱ्यात
दरम्यान, एखादी समिती नेमुन वाघ्या कुत्र्याची समाधी काल्पनिक असेल तर ती काढली पाहिजे. आणि काढायची नसेल तर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पायथ्याला असली पाहिजे. महाराजांच्या समाधीपेक्षा जास्त उंची म्हणजे शिवाजी महाराजांचा एक अपमान असा तिथल्या शिवभक्तांना वाटते, असेही गंगाधर काळकुटे म्हणालेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world