Vishalgad : विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल

दोन वेगवेगळ्या आंदोलनांमुळे या परिसरात अनेक कार्यकर्ते जमा झालेले होते. यातील संतप्त कार्यकर्त्यांनी विशाळगड परिसरात आक्रमक भूमिका घेतली.

जाहिरात
Read Time: 2 mins
कोल्हापूर:

सकाळी सहा वाजल्यापासून कोल्हापुरातील विशाळगड परिसरात (Vishalgad) तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पाऊस असताना देखील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले होते. त्यांच्या हातात काठ्या होत्या. रविवारी हळूहळू विशाळगड अतिक्रमण हटाव मोहिमेचं वादात रूपांतर झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chatrapati) आणि रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनातील कार्यकर्त्यांची विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटाव ही भूमिका होती. 

संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली विशाळगडावर अतिक्रमण मुक्ती मोहीम रविवारी राबविण्यात आली. मात्र काही वेळानंतर या मोहिमेला हिंसक वळण लागण्याचं पाहायला मिळालं. संभाजी राजे छत्रपती यांच्यावर आज गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. काल विशाळगड परिसरात दगडफेक आणि तोडफोड झालेल्या घटनेमुळे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंलं होतं. शाहूवाडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 50 ते 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे जमाव एकत्र करणे , शासकीय कामात अडथळा आणणे, बंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या दहा पेक्षा अधिक कलम अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

Advertisement

नक्की वाचा - घोषणाबाजी, तोडफोड, दगडफेक, लाठीचार्ज, विशाळगडावर भरपावसात काय काय घडलं?

दोन वेगवेगळ्या आंदोलनांमुळे या परिसरात अनेक कार्यकर्ते जमा झालेले होते. यातील संतप्त कार्यकर्त्यांनी विशाळगड परिसरात आक्रमक भूमिका घेतली. यावेळी मोठं नुकसान जमावाकडून करण्यात आले. पोलिसांची ही सर्व परिस्थिती हाताळताना दमछाक झाली.

Advertisement