Beed Crime : बीडमधील परळी तालुक्यात तीन दिवसात सापडतो एक मृतदेह, वर्षभराची धक्कादायक आकडेवारी

परळी तालुक्यात तीन दिवसात सरासरी एक मृतदेह सापडतो. अशी माहिती पोलीस विभागाकडून मिळाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मोहसिन शेख, प्रतिनिधी

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये गुन्हेगारीचा घटनांची राज्यपातळीवर मोठी चर्चा सुरू आहे.  बीडमध्ये बिहारसारख्या गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार सुरेश धस यांनीही बीडमधील अवैध धंदा अन् त्यातून वाढलेल्या गुन्हेगारीवर वारंवार बोट ठेवलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ट्विट करीत बीडमध्ये शस्त्र परवाने मोठ्या संख्येने दिले जात असल्याचं समोर आलं होतं. बीड जिल्ह्यात तब्बल 1 हजार 281 जणांकडे शस्त्र परवाना आहे. ही संख्या खूप मोठी आहे. सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर बीड पोलिसंनी 100 जणांचा परवाना रद्द केला आहे. धक्कादायक म्हणजे 250 जणांवर गुन्हा दाखल असताना ही मंडळी बंदूका घेऊन फिरत होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. परळी तालुक्यात तीन दिवसात सरासरी एक मृतदेह सापडतो. अशी माहिती पोलीस विभागाकडून मिळाली आहे. गेल्या वर्षभरात परळी तालुक्यातील तीन पोलीस स्टेशन हद्दीत जवळपास 109 मृतदेह सापडले आहेत. मागील वर्षभरात परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 66 मृतदेह आढळून आले, त्यापैकी 64 मृतदेहाची ओळख पटली तर 2 मृतदेहाची ओळख पटलेली नाही. परळी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकूण 17 मृतदेह आढळले आहे. सर्वांची ओळख पटली आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Walmik Karad: 'लाडकी बहीण'च्या समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात

परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत 26 मृतदेह आढळले आहे. त्यातील 21 मृतदेहाची ओळख पटवण्यात आली असून 4 मृतदेहाची ओळख पटलेली नाही. तीनही पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील वर्षभरात 109 मृतदेह शहर आणि परिसरात आढळून आले आहेत. म्हणजेच  3 दिवसांनी 1 मृतदेह सापडल्याची सरासरी आहे. या सगळ्याचा तपास जेमतेम होऊन प्रकरण फाईल बंद झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

Advertisement