जाहिरात

Walmik Karad: 'लाडकी बहीण'च्या समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात

अनेक गंभीर गुन्हे नावावर असलेल्या वाल्मिक कराडची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मीक नियुक्ती करण्यात आल्याचे समोर आलं आहे.

Walmik Karad: 'लाडकी बहीण'च्या समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात

बीड: राज्यात सध्या संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच गाजत असून या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या ताब्यात असून त्याचे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या मैत्रीचे, व्यावयासिक भागेदारीबाबत अनेक नवनवे खुलासे होत आहेत. यामध्ये आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आणि खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचा बीडच्या राजकारणात आणि प्रशासकीय कामकाजातील हस्तक्षेप समोर येत आहे. असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अनेक गंभीर गुन्हे नावावर असलेल्या वाल्मिक कराडची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मीक नियुक्ती करण्यात आल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे आता या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून ही नियुक्ती झाल्याचे समोर आले असून कराडवर १४ गुन्हे दाखल असताना लाडकी बहीण योजनेवर घेतले कसे? असा सवाल आता उपस्थित होत आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे जिल्हा नियोजन समितीवरदेखील वाल्मीक कराड सदस्य म्हणून असल्याचं समोर आले आहे. 

( नक्की वाचा : 30-30 Scam : पोत्यानं पैसे देणाऱ्या संतोष राठोडनं मराठवाड्यातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा कसा केला? )

एकीकडे वाल्मिक कराडच्या गुन्हेगारीचे, दहशतीचे अनेक नवनवे किस्से समोर येत आहेत. मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये असलेले मैत्रीचे संबंध उघडकीस येत आहेत. वाल्मिक कराडवर राजकीय वरदहस्त असल्यानेच बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचा आरोप विरोधक करत आहेत, अशातच आता या नव्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज एक महिना पूर्ण झाला. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आत्तापर्यंत एकूण सहा जणांना अटक करण्यात आली असू एक जण अद्याप फरार आहे. पोलीस याबाबतचा तपास करत आहेत. 

( नक्की वाचा: धनंजय मुंडेंना शेवटच्या क्षणी मंत्रिपद कसं मिळालं? कोणते फॅक्टर ठरले निर्णायक? )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com