Pune News: उदयनराजे भोसले पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये दाखल, 72 तासांत विविध टेस्ट, प्रकृतीची मोठी माहिती समोर

Udayanraje Bhosale Health News: सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. नेमके काय झालंय? वाचा सविस्तर बातमी...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Udayanraje Bhosale Health News: उदयनराजे भोसले यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर"
Udayanraje Bhosale FB

Udayanraje Bhosale Health News: साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उदयनराजे भोसले यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत, प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

3 दिवस विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या

मिळालेल्या माहितीनुसार, उदयनराजे भोसले यांना गेल्या तीन दिवसांपासून काही शारीरिक तक्रारी जाणवत होत्या. त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील 72 तासांपासून त्यांच्या विविध मेडिकल टेस्ट (Medical Tests) करण्यात आल्या आहेत. टेस्ट रिपोर्टनुसार डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा आणि उपचारांचा सल्ला दिला आहे. त्यानुसार आता त्यांच्यावर रीतसर औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत.

Advertisement

(नक्की वाचा: Exit Poll 2026: बंगालमध्ये दीदींचा गड कोसळणार की भाजपाचं कमळ फुलणार? पाहा सर्व एक्झिट पोलची आकडेवारी)

उदयनराजे भोसलेंची प्रकृती स्थिर

रुबी हॉल क्लिनिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उदयनराजे भोसले यांची प्रकृती सध्या स्थिर असून चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहेत. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आणखी काही दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली (Observation) ठेवण्यात येणार आहे.

(नक्की वाचा: Amol Mitkari: 'माझ्या लढाईचं हेच फळ', विधान परिषद नाकारल्यानंतर मिटकरींचा थेट इशारा)

उदयनराजे भोसले यांना डिस्चार्ज कधी मिळणार?

उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच सातारा - पुणे परिसरातील त्यांचे हजारो समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. पण प्रकृती स्थिर असल्याची अधिकृत माहिती मिळाल्यानंतर सर्वांना दिलासा मिळाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे चाहते ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत. प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाल्यानंतर त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.