School Bus Fare : पालकांना झटका; एप्रिलपासून स्कूल बसचे शुल्क 10-12 टक्क्यांनी वाढणार

School Bus Fare : एप्रिल महिन्यापासून होणाऱ्या शुल्कवाढीबाबत गर्ग यांनी म्हटलं की, "आम्ही स्कूल बस ऑपरेटर्स आणि इतर भागधारकांची बैठक घेतली आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून शुल्कवाढीचा निर्णय घेतला.

जाहिरात
Read Time: 2 mins

शाळेची भरमसाठ फी, शैक्षणिक साहित्य आणि इतर खर्च यामुळे पालकांचा खिसा आधीच रिकामा होत आहे. त्यात आता स्कूल बेचे भाडे वाढणार असल्याचे स्कूल बस मालक संघटनेने जाहीर केले आहे.  एप्रिल महिन्यापासून स्कूल बसचे शुल्क 10 ते 12 टक्के वाढणार आहे.

सरकारने सांगितले की, ते मुंबई महानगर प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी नवीन स्कूल बस सुरक्षा नियम तयार करण्यास उत्सुक आहेत. ज्यासाठी अलिकडेच स्थापन केलेल्या एक सदस्यीय समितीने शिफारसी केल्या आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत एसबीओएचे अध्यक्ष अनिल गर्ग म्हणाले की, "आमच्या ऑपरेटिंग खर्चात वाढ झाल्याने विविध कारणांमुळे बस शुल्क वाढवणे आवश्यक आहे. 2011 चे स्कूल बस धोरण आणि सुरक्षा समिती धोरण, सर्वोच्च न्यायालयाच्या स्कूल बसेसवरील मार्गदर्शक तत्त्वांव्यतिरिक्त नवीन नियमांची आवश्यकता नाही," असंही ते म्हणाले." 

(ट्रेंडिंग बातमी-  Crime News : हात-पाय मोडले, अंगावर चटके दिले; दत्तक घेतलेल्या चिमुकलीची छळ करुन हत्या)

एप्रिल महिन्यापासून होणाऱ्या शुल्कवाढीबाबत गर्ग यांनी म्हटलं की, "आम्ही स्कूल बस ऑपरेटर्स आणि इतर भागधारकांची बैठक घेतली आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून शुल्कवाढीचा निर्णय घेतला. हे नवीन बस खरेदी करण्यासाठी वाढत्या भांडवली खर्चामुळे, या बसेसच्या देखभालीचा मोठा खर्च, कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, बसेसमध्ये सक्तीची जीपीएस प्रणाली आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे यामुळे झाले आहे."

Advertisement

गर्ग यांनी सरकारच्या एक सदस्यीय पॅनेलला आणि नवीन नियम तयार करण्यासही विरोध केला. या संदर्भात त्यांनी गुरुवारी वाहतूक आयुक्त विवेक भिमनवार यांची भेट घेतली.

ट्रेंडिंग बातमी - Crime news: गर्लफ्रेंडवर 6 वेळा अत्याचार, वॉशिंग मशीनमुळे बॉयफ्रेंड गजाआड, नेमकं काय घडलं?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत म्हटलं की, शालेय बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक मुलाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नवीन नियमांची तातडीने आवश्यकता आहे. विद्यार्थी, पालक इत्यादींना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे प्रत्यक्ष परीक्षण करण्यासाठी आणि नवीन उपाययोजना सुचवण्यासाठी आम्ही एक सदस्यीय पॅनेल स्थापन करण्याबाबत गंभीर आहोत. त्यानंतर सरकार सध्याच्या परिस्थितीवर आधारित नवीन नियम तयार करेल." 

Advertisement

"जे पालक आपल्या मुलांना स्कूल बसने पाठवण्यासाठी कष्टाचे पैसे खर्च करतात त्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री देणे आवश्यक आहे. "नवीन पॅनेल एक व्यापक मूल्यांकन करेल, जे स्कूल बस नियमनाचा पाया तयार करेल", असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.  

Topics mentioned in this article