विशाल पाटील, प्रतिनिधी
चित्रपट अभिनेता शाहरुख खानने (Shahrukh Khan) वांद्रे पश्चिम येथील मन्नत बंगल्याच्या बांधाकासाठी मागितलेली परवानगी मुंबई महापालिकेने दिली आहे. 14 मे 2025 रोजी मन्नत बंगल्याच्या बांधकामासाठी दिलेले परवानगी पत्र 'NDTV मराठी' ला मिळालं आहे. मन्नत बंगल्यात सातवा आणि आठवा मजला बांधण्यासाठी शाहरुख खाननं परवानगी मागितली होती. ती महापालिकेनं दिली आहे.
शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याचा शेवटचा मंजुरी प्लान हा 20 जानेवारी 2025 चा आहे. याबाबत दिलेल्या सीसीची वैधता 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत असेल. तसंच या बांधकामासाठी 5 लाखांची बँक गॅरंटी असेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शाहरुख खानने महापालिकेकडे मन्नत येथील बांधकामासाठी मागितलेल्या परवानग्या
मन्नतमध्ये सातवा आणि आठव्या मजल्याचे वाढीस बांधकामास परवानगी मिळावी
सातव्या आणि आठव्या मजल्यावर अंतर्गत बदल करण्याची परवानगी
सातव्या मजल्यावरील उंची कमी करण्यासाठीसाठी परवानगी मागितली आहे शाहरुखने 4.20 मिटर उंचीची मागणी केली होती. मात्र महापालिकेकडून 3.65 मिटर परवानगी दिली आहे.
आठव्या मजल्यावर उंची ही 3.65 मिटर मागितली होती . मात्र महापालिकेकडून 4.20 मिटर उंचीची परवानगी दिली आहे.
( नक्की वाचा : Sunjay Kapur : संजय कपूरचा शेवटचा Video Viral, मृत्यूपूर्वीचे शेवटचे क्षण पाहून उडेल थरकाप )
शाहरुख दोन वर्ष दुसरिकडं राहणार, किती आहे भाडं?
शाहरुख खान त्याच्या कुटुंबीयांसह पुढील दोन वर्ष वांद्रेमधील पाली हिल भागातील फ्लॅटमध्ये राहणार आहेत. मन्नत बंगल्याच्या बांधकामामुळे त्यानं हा निर्णय घेतलाय. शाहरुख खानने अलीकडेच जॅकी भगनानी आणि त्याचे वडील वाशु भगनानी यांच्याकडून दोन डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतले आहेत. हे दोन्ही अपार्टमेंट खार पश्चिम येथील पाली हिल्समध्ये आहेत.यासाठी तो वर्षाला 2.9 कोटी इतके भाडे देईल. दोन्ही अपार्टमेंटचे एकत्रित मासिक भाडे 24.15 लाख रुपये आहे.
यामधील एक फ्लॅट अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानी आणि त्याची बहिण दीक्षा देशमुख यांच्या मालकिची असून यासाठी 11.54 लाख प्रति महिना इतके भाडे आहे. तर दुसरा ड्युप्लेक्स फ्लॅट निर्माते वासू भगनानी यांचा असून त्याचे भाडे प्रति महिना 12.61 लाख इतके आहे.