
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा (Shivswaraj Yatra) काढण्यात येत आहे. आजपासून शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळातील कारनाम्यांचा जनतेपुढे पर्दाफाश केला जाईल अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
दरम्यान रोहित पवार, रोहीत पाटील या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित नसल्यामुळे अनेर सवाल उपस्थित केले जात आहेत. अजित दादांच्या यात्रेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही यात्रेची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या यात्रेचे नाव शिवस्वराज्य असे आहे. हा यात्रेचा दुसरा टप्पा असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलयं. आजपासून यात्रेला शिवनेरी किल्ल्यावरुन सुरुवात होत आहे. यात्रेच्या माध्यमातून राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनामे जनतेसमोर आणणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. 2019 मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रा काढली होती. तेव्हा राज्याच्या आर्थिक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रयतेच्या हाताला काहीच लागलेले नाही. वीजदरवाढ, टोलमुक्त महाराष्ट्र या घोषणाच राहिल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचे भाषण हे यात्रेचे तेव्हा प्रमुख आकर्षण ठरले होते.
नक्की वाचा - पुण्यातील पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईचे निकष शिथिल, कुणाला मिळणार मदत?
जयंत पाटील काय म्हणाले?
आमची यात्रा ही साधी आहे, आमचा कोणता ही इव्हेंट नाही. जनतेच्या मनातील प्रश्न आम्ही मांडतोय, त्यासाठी कोणता विशिष्ट रंग देण्याची गरज नाही. त्यामुळं आमच्या यात्रेला जनसामान्यांचा पाठिंबा असल्याची भावना जयंत पवार यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन आले, ही बाब मविआच्या दृष्टीने चांगली. एकसंध होऊन आम्ही निवडणुका लढणार, सगळे एकत्रित निर्णय घेतील. अतुल बेनके आमच्या यात्रेत आले तर त्यांचं स्वागतच, पण मी जुन्नरमध्ये आल्यानंतर ते मला अद्याप भेटले नाहीत. ते आमच्या पक्षात येऊ इच्छितात, असं मी ऐकलेलं आहे. सत्ता आणून देतो. असं देवेंद्र फडणवीस म्हणतात हा एक दर्प आहे, जो महाराष्ट्राची जनता दूर करेल. मविआचा विधानसभा निवडणुकीचा चेहरा कोण? हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा महायुतीला त्यांचा चेहरा कोण, हा प्रश्न त्यांना विचारा, असंही जयंत पवार यावेळी म्हणाले.
शिवस्वराज्य यात्रा
9-10-11 ऑगस्ट - पुणे जिल्हा
12-13 - उस्मानबाद-सोलापूर
15-16 - बीड
१17-18 - परभणी - जालना
आज 9 ऑगस्टपासून शिवाजी महाराज जन्मस्थळ शिवनेरी येथून शिव स्वराज्य यात्रा निघणार आहे.आदिवासी दिवसाचं औचित्य साधत जुन्नर तालुक्यात हा मेळावा घेतला जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world