Eknath Shinde in Delhi: मुंबईत अधिवेशन, एकनाथ शिंदे दिल्लीत? भाजप नेत्यांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता

Eknath Shinde in Delhi : एकनाथ शिंदे बुधवारी रात्री अचानक दिल्लीत दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिंदे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत आल्याची माहिती आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

रामराजे शिंदे, नवी दिल्ली

Eknath Shinde in Delhi : मुंबई अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांदरम्यान त्यांचा दिल्ली दौरा नेमका कशासाठी आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.  

एकनाथ शिंदे बुधवारी रात्री अचानक दिल्लीत दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिंदे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत आल्याची माहिती आहे. मात्र या दौऱ्याचं अधिकृत कारण अद्याप समजलेले नाही. मात्र राज्यातील राजकीय घडामोडींवर शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं कळतंय.  

(नक्की वाचा- Dharashiv News : प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत ZP च्या मुलांना 'अळ्यांचे पौष्टिक बार'; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरूच)

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक आणि आगामी निवडणुकीत युती झाल्यास याचा शिंदेंच्या शिवसेनेला फटक बसण्याची शक्यता आहे. याशिवाय पक्षांतर्गत आमदार वेगवेगळ्या प्रकरणात टार्गेट केले जात आहेत. या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत आल्याची माहिती मिळत आहे.

Topics mentioned in this article