
Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मोठा फायदा झाला. मात्र निवडणुकीदरम्यान लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये मदत दिली जाईल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र सत्ता येऊन सहा महिने उलटून गेले तर लाडकी बहीण योजनेच्या निधीत वाढ करण्यात आलेली नाही. यावरून विरोधी पक्ष सातत्याने महायुती सरकारवर निशाणा साधत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या दरम्यान महायुती सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सोमवारी सांगितले की, राज्यावरील गंभीर आर्थिक संकट पाहता, निवडणुकीपूर्वी सत्ताधारी महायुतीच्या मित्रपक्षांनी दिलेल्या आश्वासनानुसार 'लाडकी बहीण योजने'अंतर्गत मासिक आर्थिक मदत 2100 रुपयांपर्यंत वाढवता येणार नाही. सध्या 1500 रुपये निश्चितपणे आर्थिक मदत म्हणून दिले जातील. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या विजयात या योजनेचा मोठा वाटा होता, असंही शिरसाट यांनी मान्य केलं.
(नक्की वाचा- Ajit pawar vs Shivsena: "दादा'गिरीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता! शिंदे सेनेत उद्रेक होणार?)
दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागले तरीही कल्याणकारी योजना सुरू राहील. मात्र हे खरं आहे की मासिक 1500 रुपयांची रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवता सध्या वाढवता येणार नाही. पण लोक याला मुद्दा बनवतात आणि म्हणतात की ही योजना बंद केली जाईल किंवा रक्कम कमी केली जाईल. लाडकी बहीम योजनेअंतर्गत दिलेले वचन पूर्ण केले जाईल, असंही शिरसाट यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Pahalgam attack: पाकिस्तानची टरकली! 'फतह' या क्षेपणास्त्राची केली चाचणी, 3 दिवसात 2 चाचण्या)
यापूर्वी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले होते की सरकार निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करेल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं की, देवेंद्र फडणवीस सरकार कोणतेही आश्वासन पूर्ण केल्याशिवाय सोडणार नाही.
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world