Shivsena News : स्वपक्षीयाने ब्लॅकमेल केल्याने मंत्रिपद हुकले, गोगावलेंच्या विधानाने खळबळ

मला मंत्रिपद देण्याची वेळ आली आणि मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं, त्यावेळेस आमच्याच एका आमदाराने 'तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल, तर मी लगेच राजीनामा देतो', असं म्हटलं.

Advertisement
Read Time: 2 mins

निनाद करमरकर, अंबरनाथ

शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत गटाबाजी समोर आली आहे. आमच्याच एका आमदारामुळे मला मंत्रिपद मिळू शकलं नाही, असा आरोप आमदार भरत गोगावले यांनी केला आहे.  'तुम्हाला मंत्रिपद मिळणार असेल तर मी लगेच राजीनामा देतो', अशी धमकी आमच्याच आमदाराने दिली होती. त्यामुळे मला मंत्रिपद मिळू शकलं नाही. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आता त्याच आमदाराला मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे, असं म्हणत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला. अंबरनाथमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातील भाषणात शिवसेनेचेच आमदार संजय शिरसाट यांच्यावर भरत गोगावले यांनी नाव न घेता निशाणा साधला.

(नक्की वाचा - 'मिरज पॅटर्न'ने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली? महायुतीला होणार फायदा )

मुख्यमंत्र्यांनी मला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलं असून त्यात मी समाधानी आहे. मी कधीही काहीही मागितलं नाही. मात्र ज्या वेळेस मला मंत्रिपद देण्याची वेळ आली आणि मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं, त्यावेळेस आमच्याच एका आमदाराने 'तुम्हाला मंत्रिपद मिळत असेल, तर मी लगेच राजीनामा देतो', असं म्हटलं. त्यामुळे मला मंत्रिपद सोडावं लागलं. आज त्याच आमदारांना मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्ष केलं आहे, असं आमदार भरत गोगावले म्हणाले. 

सिडकोचे अध्यक्ष झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर यावेळी गोगावले यांनी नाव न घेता निशाणा साधला. तर मला आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना दोघांनाही मंत्रिपद मिळणार होतं, मात्र आम्ही मोठा त्याग केला आहे. 'एक आमदार तर म्हणाले की मला मंत्रिपद मिळालं नाही, तर माझी बायको आत्महत्या करेल. मग आमच्या बायकांनी काय करावं?', असंही भरत गोगावले भाषणात म्हणाले. 

(नक्की वाचा-  "भारत जळणार नाही, तर सूर्याप्रमाणे प्रकाश देणार", PM मोदींच्या अमेरिकेतील भाषणाचे 10 ठळक मुद्दे)

तसेच त्या आमदारासाठी आम्ही मंत्रिपद सोडलं, कारण कुणाचं घरदार उद्ध्वस्त व्हायला नको, असंही भरत गोगावले म्हणाले. गोगावले हे अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित महाड पोलादपूर माणगाव वासियांच्या संवाद मेळाव्यासाठी आले होते. यावेळी बोलताना आपल्या भाषणात त्यांनी ही गुपितं उघडली. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट काय प्रतिक्रिया देतात? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Topics mentioned in this article