Chhatrapati Sambhajinagar : शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांना जाब विचारण्यासाठी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बँकांची शाळा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ज्यात मराठवाडा स्तरावर शिवसैनिक बँकांवर धडक देणार आहे. आज सकाळी 11 वाजता बँकांची शाळा हा उपक्रम मराठवाडा स्तरावर राबवण्यात येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी बँकांकडे अर्ज केलेले असून ,मंजुरीसाठी बँका शेतकऱ्यांकडे सिबिल व थकबाकी मागवत आहे. त्यामुळे बँक व्यवस्थापक यांना या संबंधित बाबींवर जाब विचारण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
(नक्की वाचा- Miraj News: 3 दिवस, 3 रंग, 3 गाठोडी! वाढदिवसाच्या बॅनर खाली जादूटोणा)
वेगवेगळे कारणं देत बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात नसल्याचा सतत आरोप होत आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात आकडेवारी पाहिली तर १२ हजार ८७० कोटी रुपये कृषीकर्जाचे उद्दिष्ट आहे. पण, प्रत्यक्षात ३,ल हजार ३७१ कोटींचे चकर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रमाण फक्त २६ टक्के आहे. आतापर्यंत ३ लाख ७८ हजार १३५ शेतकऱ्यांना हे कर्जवाटप झाले असून, १५ जूनपर्यंतची ही आकडेवारी आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत थेट बँकामध्ये जाऊन जाब विचारणार आहे.
(नक्की वाचा- Palghar News: बियाणे खरेदी केलं, तरच खत देणार; कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची अडवणूक)
मराठवाड्यातील पीक कर्ज वाटप ( 15 जूनपर्यंत)
छत्रपती संभाजीनगर
उद्दिष्ट : १५९१
कर्ज वाटप : ४८५
टक्केवारी : ३० टक्के
जालना
उद्दिष्ट : १३१९
कर्ज वाटप : ३२५
टक्केवारी : २४ टक्के
परभणी
उद्दिष्ट : १५८१
कर्ज वाटप : ३१३
टक्केवारी : १९ टक्के
हिंगोली
उद्दिष्ट : ८७५
कर्ज वाटप : १३४
टक्केवारी : १५ टक्के
लातूर
उद्दिष्ट : २४५८
कर्ज वाटप : ६८१
टक्केवारी : २७ टक्के
धाराशिव
उद्दिष्ट : १६९१
कर्ज वाटप : ४५८
टक्केवारी : २७ टक्के
बीड
उद्दिष्ट : १५०२
कर्ज वाटप : ४६९
टक्केवारी : ३३ टक्क
नांदेड
उद्दिष्ट : १८४९
कर्ज वाटप : ५०१
टक्केवारी : २७ टक्के