निलेश वाघ, मनमाड
शिवसेना ठाकरे गटाचे उप जिल्हाप्रमुख संतोष बळीद यांचे कार अपघातात निधन झाले. संतोष बळीद यांनी अनेक वर्ष शिवसेनेचे मनमाड शहर प्रमुखपद भूषवले. तर मनमाड नगरपरिषदेचे दोन पंचवार्षिक नगरसेवक होते. त्यांनी जनतेच्या प्रश्नावर अनेक आंदोलने केली.
संतोष बळीद यांच्या निधनाने एक लढवय्या कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांशी त्यांचे राजकारणापलिकडे संबंध होते. त्यामुळे मनमाडमधील नागरिकांवर शोककळा पसरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष बळीद हे गेल्या 25-30 वर्षातल्या मनमाड शहराच्या राजकारणातले महत्वाचे नाव होते. शिवसेना शहर प्रमुखपद भूषवताना त्यांनी कठीण परिस्थितीत पक्षाची बांधणी केली होती. हाडाचे लढवय्ये शिवसैनिक असलेले बळीद हे वीजग्राहक संघटनेच्या माध्यमातून सामान्य जनतेशी जोडले गेले होते. शेकडो आंदोलने, प्रसंगी अंगावर गुन्हे नोंदवून घेत त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले.
(नक्की वाचा- Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप)
सध्याच्या ठाकरे गटाच्या अवघड काळातही त्यांनी निष्ठेने पक्षाचे काम सुरु ठेवले होते. 2001 च्या नगरपालिका निवडणुकीपासून त्यांची कारकीर्द सुरु झाली. त्याआधी माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचे ते स्वीय सहाय्यक होते. सच्चे शिवसैनिक असलेले संतोष बळीद यांचे सामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते होते. विशेषतः वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्याचे ते हक्काचे ठिकाण होते.
(नक्की वाचा- 19 व्या विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा ठराव? 29 ठराव कोणते ते जाणून घ्या!)
अनेकदा नागरिक, माता -भगिनी लाईट बिल घेऊन संतोष भाऊंकडे तक्रार निवारणासाठी यायच्या. सर्वांशी आदराने बोलणारे, वागणारे बळीद हे अन्याया विरोधात मात्र अनेकदा सरकारी अधिकारण्याशी आक्रमक पवित्रा घ्यायचे. नागरिकांच्या प्रश्नासाठी अनेकदा त्यांनी गुन्हे अंगावर घेतले. अडचनितील कार्यकर्ता, नागरिक यांच्या मदतीसासाठी अर्ध्या रात्री धावून येणारा आणि खरेपणा, साधेपणा जपणारा सच्चा नेता आज हरपला आहे, अशी भावना नागरिकांची आहे.