Maharashtra Election: ठाकरे गटाला मोठा धक्का! शिंदेंच्या उमेदवारासाठी औरंगाबादमधील उमेदवाराची माघार

Maharashtra Election 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे औरंगाबाद मध्य मतदारसंघातील उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली आहे

जाहिरात
Read Time: 2 mins

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक राजकीय घडामोड घडली आहे. राज्यभर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्क शिंदे गटाच्या उमेदवारासाठी ठाकरे गटाच्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाला यामुळे मोठा धक्का बसला आहे.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ठाकरे गटाचे औरंगाबाद मध्य मतदारसंघातील उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली आहे. 2014 सारखी परिस्थिती होऊ नये. दोघांच्या वादात एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ नयेत, यासाठी उमेदवारी मागे घेत असल्याचे तनवाणी म्हणाले आहे. या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

(नक्की वाचा - बारामतीत काका विरुद्ध पुतण्यामध्ये लढत; दोन्ही पवार आज भरणार उमेदवारी अर्ज  )

जलील विरुद्ध जैस्वाल

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात प्रदीप जैस्वाल विरुद्ध एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रदीप जैस्वाल यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवली आणि येथील जनतेने त्यांना विजयीही केले.

(नक्की वाचा-  शिवसेना शिंदे गटाची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, आदित्य ठाकरेंसमोर 'या' खासदाराचं आव्हान)

2014 च्या विधानसभा निवडणुकीत MIM पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले होते. अशा स्थितीत यावेळच्या विधानसभा निवडणुकीत शिनसेनाला अधिक संधी असल्याचे दिसते. मात्र दोन्ही शिवसेनेचे उमेदवार रिंगणात असतील तर मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा एमआयएमला होण्याची शक्यता होती.

अंबादास दानवे यांनी याबाबत म्हटलं की, किशनचंद तनवाणी यांनी अशी भूमिका का घेतली माहीत नाही. त्यांनी आग्रहाने उमेदवारी घेतली आहे. उमेदवारी मागून घेऊन अशी माघार घेणे मला चुकीचं वाटतं. किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली तरी आमच्याकडे पर्याय कमी नाही. तीन-चार जण इच्छूक आहेत. मात्र तनवाणी यांच्याशी बोलूनच पुढील निर्णय घेऊ.