उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांसाठी कोकणाला दुय्यम वागणूक? रेल्वेमंत्र्यांना दिलेलं 'ते' पत्र होतंय व्हायरल

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या विशेष रेल्वेबाबत मध्य रेल्वेकडून कोकणवासीयांना दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीविरोधात शिवसेना (UBT)चे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Arvind Sawant Letter To Railway Minister

Arvind Sawant latest News :  उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या विशेष रेल्वेबाबत मध्य रेल्वेकडून कोकणवासीयांना दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीविरोधात शिवसेना (UBT)चे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. मध्य रेल्वेच्या 'उत्तर भारत केंद्रित'धोरणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.याप्रकरणी एक पत्र सादर करून दादर रत्नागिरी ट्रेन पुन्हा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे, अशी माहिती सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

पत्रातील महत्त्वाचे मुद्दे

 कोकणच्या वाट्याला केवळ ३६ गाड्या: मध्य रेल्वेने १९ मार्गांवरून अंदाजे १,५०० 'समर स्पेशल'गाड्यांचे नियोजन केले आहे.यापैकी तब्बल ४५० गाड्या बिहारसाठी,३३२ गाड्या उत्तर प्रदेशसाठी सोडल्या.याउलट,मुंबईतून लाखो चाकरमानी ज्या कोकणात प्रवास करतात,त्या मार्गावर (मडगाव व्हाया कोकण) केवळ ३६ गाड्या सोडण्यात आल्य.हा अन्याय आहे.

उत्तर भारतासाठी रोज,तर कोकणासाठी आठवड्यातून एकदाच:एप्रिल महिन्यात'सीएसएमटी-गोरखपूर'विशेष गाडी दररोज धावणार आहे.तर 'सीएसएमटी-मडगाव'ही गाडी १६ एप्रिल ते ११ जून दरम्यान केवळ आठवड्यातून एकदा (गुरुवारी) धावणार आहे. हा विरोधाभास संतापजनक आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Crime: छत्रपती संभाजी नगरमध्ये खळबळ! मृदंगाचार्य लाघाने महाराजांच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीनं जीवन संपवलं

नियमित गाड्या हाऊसफुल्ल: उन्हाळी सुट्ट्यांसाठी मांडवी,कोकण कन्या, जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस इ. सारख्या नियमित गाड्यांच्या स्लीपर क्लासची 'वेटिंग लिस्ट' १०० च्या पुढे गेली आहे, याची जाणीव मंत्र्यांना करून दिली.

जनआंदोलनाचा इशारा

सध्याचे रस्ते घाटांचे अवघड मार्ग आणि वाहतूक कोंडी यामुळे रस्ते प्रवास सोयीचा व सुरक्षित राहिलेला नाही. अशा वेळी रेल्वेने कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडले आहे. मध्य रेल्वेच्या या उत्तर भारत-केंद्रित धोरणामुळे कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप आहे.हा अन्याय तातडीने दूर न केल्यास कोकणातील जनतेचा उद्रेक होईल आणि आम्हाला तीव्र जनआंदोलन छेडावे लागेल, असाही इशारा सावंत यांनी दिली आहे.

नक्की वाचा >> Gautam Adani: गौतम अदाणी यांची कुटुंबासह अयोध्येतील राम मंदिराला भेट, दर्शन घेतल्यानंतर दिली मोठी प्रतिक्रिया

प्रमुख मागण्या

कोकणवासीयांची गैरसोय आणि प्रवासी संख्या लक्षात घेऊन 

१. मध्य रेल्वेला तातडीने निर्देश देऊन कोकणाकडे जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवून त्या 'दररोज' कराव्यात.

२. प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त रेक्स (Rakes/डबे) उपलब्ध करून द्यावेत, अशा मागण्या केल्या आहेत.