Gautam Adani latest News : अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी गुरुवारी सहकुटुंब राम मंदिरमध्ये श्री राम प्रभुंचं दर्शन घेतलं.यावेळी त्यांनी कुटुंबासह श्री राम जन्मभूमी परिसरातील मूर्ती आणि मंदिराती कोरीव कामाची पाहणी केली. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राशी संबंधीत चंपय राय यांनी त्यांना मंदिराबाबत महत्त्वाची माहिती सांगितली. अदाणी यांच्यासोबत पत्नी प्रीति अदाणी आणि मुलगा करण अदाणीही उपस्थित होते. पुजाऱ्यांचा पूजा विधी सुरु असताना त्यांनी मंदिरात पूजा करून देवतांचं आशीर्वाद घेतला. श्री राम तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना राम मंदिराबाबतचा इतिहासासंबंधीत महत्त्वाची माहिती सांगितली.
गौतम अदाणी काय म्हणाले?
"भारताची संस्कृती एकता आणि आत्मविश्वासाचं प्रतिक आहे. प्रभू श्री राम यांचे विचार आपल्याला सत्य आणि कर्तव्याच्या मार्गावर जाण्यासाठी प्रेरणा देतात. मी प्रार्थना करतो की, प्रभू श्री राम यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहूदे आणि आपल्या देशाची कायम प्रगती होऊदे. इथे गुरुकूलमध्येही येण्याची संधी मिळाली.मुलांसोबत थोडा वेळ घालवला.
'प्रभु श्री राम का आर्शिवाद हम सब पर बना रहे और हमारा देश निरंतर प्रगति के पथ पर आगे बढ़ते रहे': अदाणी ग्रुप के चेयरमैन गौतम अदाणी#GautamAdani pic.twitter.com/ve2RLVdla4
— NDTV India (@ndtvindia) April 2, 2026
नक्की वाचा >> Eknath Shinde Fake OSD: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तोतया OSD पुण्यात गजाआड;थेट पोलीस उपायुक्तांवरच आणला दबाव
गुरुकूल आजच्या युगात संस्कृतीला जागृत ठेवण्याचं खूप महत्त्वाचं काम करत आहे. अदाणी फाऊंडेशनकडून एक गुरुकूल संस्कृती जपण्यासाठी आणि आजच्या एआय जमन्यात आपल्या संस्कृतीत आणखी विवेक कसा जागृत होईल,त्यासाठी जे काही सहकार्य लागेल, ते आम्ही पूर्ण करू", अशी माहिती गौतम अदाणी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world