Shocking news: ऑनलाइन ओळख, प्रेमाचे जाळे अन् शारीरिक संबंध! 'सिरियल लव्हर' च्या कारनाम्यांनी पोलिसही हादरले

एकाच आरोपीविरुद्ध दोन महिलांच्या तक्रारी समोर आल्यानंतर, पोलिसही चक्रावून गेले होते.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

संजय तिवारी 

एका तरुणाचे ऑनलाईन आणि मग ऑफलाईन चाळे बघून पोलिस देखील थक्क झाले आहेत. नागपूरात हा प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन चाळे त्याने प्रत्यक्ष केले. त्याचा परिणाम म्हणून या तरुणावर दोन पोलिस ठाण्यात एकाच स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रीतम नावाच्या या तरुणाला पोलिसांनी अटक देखील केली आहे. दोन महिलांनी हिमतीने समोर येऊन तक्रार दिल्याने हे गुन्हे दाखल झाले आहेत. ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करणे, मग त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि नंतर माघार घेणे अशा पद्धतीचे प्रीतमचे चाळे होते. तस आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. 

या सिरिअल लव्हरचे नाव प्रीतम रवी लावणकर असे आहे. तो सोशल मीडिया आणि ऑनलाइन लाइफ पार्टनर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करायचा. आधी तो त्यांचा विश्वास जिंकत होता.त्यानंतर लग्नाचे स्वप्न दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होता. मग वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून त्याने त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीतील 31 वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीत तिने गंभीर आरोप केला आहेत. तीने सांगितले की फेसबुकवर मैत्री झाली. त्यानंतर आरोपीने लग्नाचा विश्वास दिला. या विश्वासाच्या आधारावर अनेकदा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, अलीकडेच जेव्हा महिलेने लग्नाबद्दल थेट विचारले तेव्हा आरोपीने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

नक्की वाचा - DMart Offer: डी मार्टमध्ये 60 रूपयांच्या 'या' वस्तूसाठी ग्राहकांच्या उड्या, ही खास वस्तू आहे तरी काय?

दुसरीकडे, बजाजनगर पोलीस स्टेशन हद्दीतील 34 वर्षीय महिलेने याच प्रीतम विरोधात तक्रा दाखल केली आहे. तिने सांगितले की ऑनलाइन लाइफ पार्टनर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तिची प्रीतम सोबत ओळख झाली.  ओळख झाल्यानंतर आरोपीने तिला निर्जन ठिकाणी बोलावून लग्नाचे आमिष दाखवले. त्याच वेळी तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. नंतर महिलेला या प्रीतमचे  दुसऱ्या तरुणीशी संबंध असल्याचे समजले. यातून दोघांमध्ये वाद झाला. प्रीतमने या महिलेला  शिवीगाळही केली. त्यानंतर तिने त्याच्या विरोधात गुन्हे दाखल केले.  एकाच आरोपीविरुद्ध दोन महिलांच्या तक्रारी समोर आल्यानंतर, पोलिसही चक्रावून गेले होते.  

नक्की वाचा - DMart: डी-मार्टमध्ये इतर स्टोरअर्सच्या तुलनेत मॅगी स्वस्त का मिळते? हे सिक्रेट 99% लोकांना माहितच नाही

त्यानंतर बेल्तरोडी पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोपीने आणखी किती महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे याचा तपास करत आहेत. शिवाय आरोपीची माहिती ही सार्वजनिक केली जात आहे. त्यात जर कुणी याचे शिकार झाले असेल तर समोर येवून तक्रार देण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे.  बेलतरोडी पोलीस ठाणेचे अधिकारी रितेश अहेर यांनी याबाबत माहिती दिली आहे. शिवाय सोशल मीडियावर मैत्री करताना सावध राहवे. जो निर्णय घ्याल तो विचारपूर्वक घ्यावा असे ही आवाहन करण्यात येत आहे.