Mumbai News : मराठीविरोधात स्टेटस ठेवणे विक्रोळातील एका व्यापाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या मुजोर दुकानचालकाची चांगलीच धुलाई केली. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर दुकानदाराने मराठी माणसाची हात जोडून माफी मागितली आहे. विक्रोळीच्या टागोर नगर परिसरातील या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आली आहे.
मराठी माणसाविरोधात अपशब्द वापरणाऱ्या या माजुरड्या व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आहे. मारवाडी व्यक्तीची ताकद बघा असं म्हणत या व्यक्तीने मराठी विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरला होता. मनसैनिकांनी मराठी माणसाची ताकद दाखवल्यानंतर या मुजोरा दुकानचालकाची मस्ती जिरली. मनसैनिकांना पाहून तो हातापाया पडू लागला. कान पकडून माफी मागू लागला. मी अशी चूक परत करणार नाही, असंही बोलत होता.
(नक्की वाचा- Pandharpur News : माळशिरस नगरपंचायतीचे सभागृहच गेले चोरीला; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, शोध सुरु)
चोप दिल्यानंतर अशा व्यापाऱ्यांच्या दुकानातून कुणी सामान घेऊ नये, असं आवाहन देखील मनसे विभाग अध्यक्ष विश्वजीत ढोलम यांनी केले. व्यापाऱ्याला चोप दिल्यानंतर मार्केटमधून त्याची धिंड काढत पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- IndiGo Flight: पायलटच्या 'पॅन पॅन पॅन' मेसेजमुळे विमानतळावर धावपळ; इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग)
व्हॉट्सअॅप स्टेटस काय होते?
मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलेल्या दुकानदाराने व्हॉट्सअॅपवर "देख लिया राजस्थानी का पॉवर. मराठी को महाराष्ट्र मे ही पेल दिला. हम मारवाडी हमारे सामने किसी की नही चलती", असं स्टेटस ठेवलं होतं.