जाहिरात

Pandharpur News : माळशिरस नगरपंचायतीचे सभागृहच गेले चोरीला; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, शोध सुरु

माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनीच आपले सहकारी यांना सोबत घेत आणि अधिकाऱ्यांशी संगणमत करून केवळ कागदावर विकास कामे दाखवत मोठा भ्रष्टाचार केला आहे. असा आरोपही नगरसेविका रेश्मा टेळे आणि सोमनाथ वाघमोडे करत आहेत. 

Pandharpur News : माळशिरस नगरपंचायतीचे सभागृहच गेले चोरीला; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, शोध सुरु

संकेत कुलकर्णी, पंढरपूर

Pandharpur News : माळशिरस नगरपंचायतीचे तब्बल 45 लाख रुपयांचे सभागृह चोरीला गेली असल्याची घटना घडली. याबाबत माळशिरसमधील सर्वपक्षीय संघटनांचे नेते आणि नगरसेविकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे, अशी माहिती माळशिरसच्या नगरसेविका रेश्मा टेळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यानंतर सभागृह चोरीला गेल्याचे वृत्त ऐकून मोठी खळबळ माळशिरस तालुक्यात उडालेली दिसून येते. 

माळशिरस नगरपंचायतीमध्ये पालिकेचे सभागृह बांधण्यासाठी तब्बल 44 लाख 999 रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यातूनच सभागृह बांधण्यासाठीची वर्क ऑर्डर देण्यात आली. मात्र ज्या दिवशी वर्कऑर्डर दिली. त्याच दिवशी संबंधित काम पूर्ण झाल्याबाबत बिल मागणीचा अर्ज करण्यात आला. यानंतर माळशिरसमध्ये सभागृह कुठे बांधले? याचा शोध सुरू झाला. मात्र माळशिरसमध्ये सभागृह आढळून येत नाही. हे सभागृह केवळ कागदावर आहे. त्यामुळे माळशिरस नगरपंचायतीचे सभागृह चोरीला गेले असल्याचे आम्हाला भासत असल्याचे माळशिरस मधील राजकीय पदाधिकारी आणि नगरसेविका म्हणत आहेत.

(नक्की वाचा- IndiGo Flight: पायलटच्या 'पॅन पॅन पॅन' मेसेजमुळे विमानतळावर धावपळ; इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग)

माळशिरसमध्ये भाजपचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नगरपंचायतीवर सत्ता आहे. आप्पासाहेब देशमुख यांनीच आपले सहकारी यांना सोबत घेत आणि अधिकाऱ्यांशी संगणमत करून केवळ कागदावर विकास कामे दाखवत मोठा भ्रष्टाचार केला आहे. असा आरोपही नगरसेविका रेश्मा टेळे आणि सोमनाथ वाघमोडे करत आहेत. 

याच भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. यामध्ये नगरसेविका रेश्मा टेळे, नगरसेवक कैलास वामन, सोमनाथ वाघमोडे, किरण चव्हाण, पांडुरंग तात्या वाघमोडे यांच्यासह माळशिरसमधील सर्व संघटना आघाड्या आणि इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन भ्रष्टाचाराबाबत तक्रारी दिले आहेत. या सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक देखील झाली. यानंतर त्यांनी सोलापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रारी दिली आहे.

(नक्की वाचा-  Kolhapur News : 'कोल्हापुरी चप्पल' वापराचा वाद; 'प्राडा'विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली)

माळशिरसच्या सभागृहाबाबत  सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करत माळशिरस नगरपंचायतीतील सभागृहाबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे नगरसेविका रेश्मा टेळे यांनी सांगितले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com