Snehlata Deshmukh : मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचं निधन 

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू, पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या विद्यमान संचालिका डॉ. स्नेहलता देशमुख यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू, पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या विद्यमान संचालिका डॉ. स्नेहलता देशमुख यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. दुपारी 2 वाजता विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती आहे.  

गर्भसंस्कार, नवजातशिशू आणि मातांचा आहार या विषयांवर त्यांनी विशेष काम आणि लिखाण केलं आहे. एक अभ्यासू ,सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्नेहलता देशमुख यांनी बालशल्यचिकित्साची पायाभरणी केली. गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र, तंत्रयुगातील उमलती मने, अरे संस्कार संस्कार इत्यादी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. 1995-2000 या काळात त्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी होत्या. याशिवाय त्यांनी शीव रुग्णालयाच्या अधिष्ठातापदीही काम केलंय. वैद्यकीय क्षेत्रासह त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. त्याच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

बातमी अपडेट होत आहे.