ST Employee Strike : भरघोस पगारवाढ ते कॅशलेस मेडिकल विमा, कर्मचाऱ्यांना संपानंतर मिळाल्या 5 मोठ्या गोष्टी

एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये 2500, 4000 आणि 5000 अशी पगार वाढ मिळाली होत. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगरात वाढ होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट 6500 रुपयांचा वाढ करण्यात आली आहे. मात्र ती मागील पगारवाढीनुसार मिळणार आहे.   

जाहिरात
Read Time: 2 mins

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपाला मोठं यश मिळालं आहे. एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढी महत्त्वाची मागणी सरकारने मान्य केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगारात सरसकट साडेसहा हजार रुपयांची वाढ होणार आहे. पुढील महिन्यापासून ही वाढ मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. 

पगारवाढ कुणाला कशी मिळणार?

एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये 2500, 4000 आणि 5000 अशी पगार वाढ मिळाली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगरात वाढ होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट 6500 रुपयांचा वाढ करण्यात आली आहे. मात्र ती मागील पगारवाढीनुसार मिळणार आहे.   

(नक्की वाचा-  ST कर्मचाऱ्यांचा संप मागे, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा; पगारात मोठी वाढ)

म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये 5000 रुपयांची वाढ मिळाली होती त्यांना पगारात आता 1500 रुपये वाढ मिळणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना 4000 रुपये वाढ मिळाली होती त्यांना 2500 रुपये वाढ मिळणार आहे. तर 2500 रुपये वाढ झालेल्या कर्मचाऱ्यांना 4000 वाढ पगारात मिळणार आहे, अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली.  

(नक्की वाचा - Aadhaar Card या पद्धतीनं घरीच करा मोफत अपडेट, उशीर केलात तर होईल खर्च !)

कर्मचाऱ्यांना आणखी काय मिळालं?

  • मूळ वेतनात सरसकट साडे सहा हजारांच्या वाढीशिवाय दोन वर्षापासून जे कर्मचारी निलंबित होते त्यांना पुन्हा कामावर घेण्यात येणार आहे.
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना वर्षभराचा मोफत पास दिला जाणार आहे.
  • कर्मचाऱ्यांची कॅशलेस मेडिकल विम्याची मागणी देखील मान्य करण्यात आली आहे.
  • याशिवाय 193 एसटी डेपोंच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव देखील मान्य करण्यात आला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article