ST कर्मचाऱ्यांचा संप मागे, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा; पगारात मोठी वाढ

एसटी कर्मचाऱ्यांना साडेसहा हजार रुपये मूळ वेतनात वाढ देण्याचं आश्वासनही बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

एसटी कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची वेतन वाढीची मागणी सरकारने मान्य केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना साडेसहा हजार रुपये मूळ वेतनात वाढ देण्याचं आश्वासनही बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे मी मनापासून आभार मानतो. आमची सर्वांची हीच मागणी होती की, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे. सरकारने जी समिती गठीत गेली होती त्या समितीने देखील 2020 पासून 5500 रुपये सरसकट वाढ करावी अशी विनंती सरकारकडे केली होती. ती विनंती सरकारने मान्य केली आहे.

(नक्की वाचा-  Job Interview Tips : मुलाखतीदरम्यान या चुका टाळल्यास तुमची नोकरी पक्की समजा! )

पगारवाढ कुणाला कशी मिळणार?

ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये 2500, 4000 आणि 5000 अशी वाढ मिळाली होती, त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट 6500 रुपयांचा वाढ करण्यात आली आहे.  म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांना 2021 मध्ये 5000 रुपयांची वाढ मिळाली होती त्यांना 1500 रुपये वाढ मिळणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना 4000 रुपये वाढ मिळाली होती त्यांना 2500 रुपये वाढ मिळणार आहे. तर 2500 रुपये वाढ झालेल्या कर्मचाऱ्यांना 4000 वाढ पगारात मिळणार आहे, अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली.  

एसटी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य झाल्याने त्यांना पुकारलेला संप मागे घ्यावा. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना उद्या कामावर रुजू व्हावं, अशी विनंती गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. 

Advertisement

(नक्की वाचा -  उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने भाजपचं नुकसान; रावसाहेब दानवे सविस्तर बोलले)

काय होत्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

  • राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे.
  • कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा थकबाकी महागाई भत्ता मिळणेबाबत
  • घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ थकबाकी अदा करावी
  • 2015-2020 या कालावधीसाठी जाहीर केलेल्या रुपये 4849 कोटीमधील शिल्लक रक्कम वाटप करावी
  • सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट 5000 रुपयांची वाढ करावी
  • आयुर्मान संपलेल्या बसेस चालनातून काढून घ्याव्यात व स्वमालकीच्या एस.टी. बसेस उपलब्ध करून द्याव्यात. तसेच मनुष्य बळही उपलब्ध करून द्यावे.
     
Topics mentioned in this article