जाहिरात

उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने भाजपचं नुकसान; रावसाहेब दानवे सविस्तर बोलले

अजित पवार आमच्यासोबत आल्याने भाजपचं नुकसान झालेलं नाही. तर उद्धव ठाकरे यांना असंगाशी संगत करुन धोका दिला. त्यामुळे भाजपचं नुकसान झालं. उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने आमचं नुकसान झालं, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. 

उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने भाजपचं नुकसान; रावसाहेब दानवे सविस्तर बोलले

लक्ष्मण सोळुंके, जालना

अजित पवार भाजपसोबत आल्याने नव्हे तर उद्धव ठाकरेंनी युती तोडल्यानं भाजपचं नुकसान झालं आहे, असं भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी असंगतांशी संगत केली आणि आम्हाला धोका दिला. जनतेच्या जनदेशाचा अनादर केला यात उद्धव ठाकरे यांचंही नुकसान आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत लोक त्यांना धोका देतील, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रावसाहेब दानवे यांना याबाबत रावसाहेब दानवे यांनी म्हटलं की, अजित पवार आमच्यासोबत आल्याने नव्हे तर उद्धव ठाकरेंनी 2019 विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी धोका दिल्याने भाजपचं नुकसान झालं. 2019 मध्ये शिवसेना-भाजपने एकत्र निवडणूक लढली आणि सत्ता स्थापनेचा जनादेश आम्हाला मिळाला. लोकांना आम्हाल बहुमत दिलं.  

(नक्की वाचा -  जनता पूरपरिस्थितीमुळे त्रस्त, भाजप आमदार नाच-गाण्यात व्यस्त; गौतमीसोबतचा VIDEO Viral )

मात्र उद्धव ठाकरे यांच्या मनाता किंतु-परंतु आला. त्यावेळी त्यांनी आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचं जाहीर केलं. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रलादी काँग्रेसच्या विरोधात राजकारण केलं. त्यांच्या विचाराशी कधीही सहमत होऊ शकले नाही. मात्र सत्तेच्या लालचेपोटी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. त्यामुळे आमचं सरकार बनू शकलं नाही, हे आमचं नुकसान झालं, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा -  राहुल गांधी सांगलीत येणार, पवारांची उपस्थिती, ठाकरे दांडी मारणार?)

अजित पवार आमच्यासोबत आल्याने भाजपचं नुकसान झालेलं नाही. तर उद्धव ठाकरे यांना असंगाशी संगत करुन धोका दिला. त्यामुळे भाजपचं नुकसान झालं. उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने आमचं नुकसान झालं, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Aadhaar Card या पद्धतीनं घरीच करा मोफत अपडेट, उशीर केलात तर होईल खर्च !
उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने भाजपचं नुकसान; रावसाहेब दानवे सविस्तर बोलले
ST employees strike called off In meeting with CM Eknath shinde 6500 rs increase in salary
Next Article
ST कर्मचाऱ्यांचा संप मागे, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा; पगारात मोठी वाढ