
डॉली चहावाला. हा नागपूरचा प्रसिद्ध चहा विक्रेता सोशल माडियावर या डॉली चहावाल्याची धूम असते. सोशल मीडियावर त्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. आता याच डॉली चहावाल्याची एक बातमी सोशल मीडियावर चर्चाचा विषय ठरली आहे. ती म्हणजे डॉली चहावाला आता स्टारबक्स इंडियाचा ब्रँड ॲम्बेसेडर झाला आहे. याबाबतच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर स्टारबक्सने ही या मागचे सत्य काय आहे हे समोर येवून सांगितले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्टारबक्सने केला खुलासा
स्टारबक्स इंडियाने सोमवारी एक अधिकृत निवेदन केले आहे. त्यात त्यांनी कंपनीचा डॉली चहावाला म्हणजेच सुनील पाटील यांच्यासोबत कोणताही ब्रँड सहयोग (collaboration) झालेला नाही. तो आमचा ब्रँड अम्बेसेडर नाही असं स्पष्ट केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका चित्रात स्टारबक्सच्या कपावर डॉली चहावालांचे नाव आणि चित्र दिसत होते. यानंतर अनेक जणांनी सोशल मीडियावर डॉली आता स्टारबक्सचा ब्रँड ॲम्बेसेडर झाला आहे असं म्हटलं होतं.
स्टारबक्सचं म्हणणं काय?
दीक्षित दवे यांनी सर्वात आधी एक ट्वीट केले होते. त्यात त्यांनी लिहिले होते की,(Dolly Chaiwala Starbucks) "डॉली चाहावाला स्टारबक्स इंडियाचा ब्रँड ॲम्बेसेडर झाला आहे. " यानंतर सोशल मीडियावर मीम्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. मात्र, आता स्टारबक्सने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, "आम्ही काही सोशल मीडिया पोस्ट पाहिल्या आहेत. त्यात असे म्हटले जात आहे की टाटा स्टारबक्सने एक ब्रँड ॲम्बेसेडर नियुक्त केला आहे. त्यानंतर कंपनीने सांगितले की टाटा स्टारबक्सचा भारतात कोणताही अधिकृत ब्रँड ॲम्बेसेडर नाही. शिवाय डॉली चहावाला याच्यासोबत आमचा कोणताही संबंध नाही.
व्हायरल झालेले 'मीम'
कंपनीने असेही सांगितले की, व्हायरल झालेले चित्र एका थर्ड पार्टीने बनवलेल्या मीमचा भाग होते. त्याला काही लोकांनी खरं समजलं. स्टारबक्सने असेही सांगितले की, आम्ही सत्य काय आहे हे सांगितले आहे. आम्हाला आमच्या ग्राहकांची काळजी आहे. त्यामुळे त्यांनाही सत्य समजले पाहीजे म्हणून आम्ही हा खूलासा केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन ही त्यांनी केलं आहे.
डॉली चहावाला कोण आहे?
डॉली चहावाला याचे खरे नाव सुनील पाटील आहे. तो नागपूरचा रहिवाशी आहे. शिवाय तो चहा विकतो. चहा विकण्याच्या त्याच्या अनोख्या शैलीमुळे तो सोशल मीडियावर फेमस आहे. त्याचे अनेक चहाते ही आहेत. तो त्याच्या कपड्यांवरून ही चर्चेचा विषय ठरला आहे. कधी चमकदार जॅकेट, सोन्याची साखळी, मोठे चष्मे आणि अनोख्या हेअरस्टाईलमध्ये तो दिसतो. चहा बनवण्याची त्यांची पद्धत खूप वेगळी आहे. त्यामुळे अनेक लोक त्याच्याकडे चहासाठी येत असतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world