मुंबईच्या डबेवालांना राज्य सरकारचं गिफ्ट; स्वस्तात मिळणार हक्काचं घर

मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजाला 25 लाखात ही घरे दिली जाणार आहेत. डबेवाला आणि चर्मकार बंधू यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पुढील 3 वर्षात पूर्ण होणार आहे.  

जाहिरात
Read Time: 1 min

मुंबईच्या डबेवाल्यांना राज्य सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान आवास योजनेतून डबेवाल्यांना घरे दिली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राज्य सरकारच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आश्वासन मुंबईच्या डबेवाल्यांना आश्वासन दिले होते. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईच्या डबेवाल्यांसाठी 12 हजार घरांची निर्मिती होणार आहे. यात चर्मकार समाजातील बांधवांसाठी देखील घरे राखीव असणार आहेत. या प्रकल्पासाठी 30 एकर जागा प्रियांका होम्स रियालिटी देणार आहे. नमन बिल्डर ना नफा ना तोटा तत्वावर हे बांधकाम करणार आहे. 500 चौरस फुटांच्या 12,000 घरांची निर्मिती केली जाणार आहे. 

मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजाला 25 लाखात ही घरे दिली जाणार आहेत. डबेवाला आणि चर्मकार बंधू यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पुढील 3 वर्षात पूर्ण होणार आहे.  

(नक्की वाचा-  अजित पवार म्हणतात मीच साहेब, कोल्हे म्हणाले राज्यात फक्त 2 साहेब, एक बाळासाहेब दुसरे...)

सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका होम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, आमदार श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड महाराज यावेळी उपस्थित होते.

Advertisement

Topics mentioned in this article