विद्यार्थ्यांना मराठीच वाचता येईना, मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्ह्यांमधील स्थिती गंभीर

भाषाज्ञानासाठी पहिली ते तिसरीपर्यंतच्या 3 लाख 72 हजार 977 विद्यार्थ्यांची पाहणी करण्यात आली. त्यात 1 लाख 14 हजार 701 विद्यार्थ्यांना मराठीसह इतर भाषेची छोटी, मध्यम व मोठी वाक्य वाचता आलेली नाहीत.

जाहिरात
Read Time: 2 mins

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने घोषणा केली आहे. मात्र, मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांतील जिल्हा परिषद शाळांमधील 29 टक्के विद्यार्थ्यांना मराठीच वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विभागीय प्रशासनाने केलेल्या पाहणीत हे सर्व उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे लातूर व बीडचे निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. विभागीय प्रशासनाकडून पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान पाहणी करण्यात आली. ज्यात अनेक विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचे समोर आले आहे. 

(नक्की वाचा- हिंगोलीत पोलिसाचा स्वत:च्याच कुटुंबातील सदस्यांवर गोळीबार, पत्नीचा मृत्यू; अनेकजण जखमी)

भाषाज्ञानासाठी पहिली ते तिसरीपर्यंतच्या 3 लाख 72 हजार 977 विद्यार्थ्यांची पाहणी करण्यात आली. त्यात 1 लाख 14 हजार 701 विद्यार्थ्यांना मराठीसह इतर भाषेची छोटी, मध्यम व मोठी वाक्य वाचता आलेली नाहीत.

आकडेवारी काय सांगते?

1 लाख 16 हजार  741 विद्यार्थ्यांपैकी  77 हजार 370 पहिलीतील विद्यार्थी 4 ते 5 शब्द असलेले छोटी वाक्ये वाचतात. 39 हजार 371 विद्यार्थ्यांना छोटी वाक्येदेखील वाचता येत नाहीत. हे प्रमाण 33.73 टक्के आहे.

Advertisement

1 लाख 23 हजार 861  विद्यार्थ्यांपैकी 85 हजार 970  इयत्ता दुसरीमधील विद्यार्थ्यांना 40 ते 50 शब्द असलेली वाक्य वाचन करता येतात. तर 37 हजार 839 विद्यार्थ्यांना वाक्य वाचता येत नाहीत. हे प्रमाण 30.59 टक्के आहे

(नक्की वाचा-  Room No. 602 : काय आहे मंत्रालयातील रहस्यमय रुमची गोष्ट? ते दालन घेण्यास मंत्री का घाबरतात?)

1 लाख 32 हजार 385 विद्यार्थ्यांपैकी 94 हजार 936 इयत्ता तिसरीमधील विद्याथ्यर्थ्यांना 60 शब्द असलेले वाक्य वाचन करता येतात. तर ३७ हजार ४३९ विद्यार्थ्यांना वाक्य वाचता येत नाहीत. हे प्रमाण 28.28 टक्के आहे.

Advertisement

Topics mentioned in this article