Indian Railway : भारतीय रेल्वे स्थानकांचं रुप पालटणार, आता स्टेशनवर मिळणार पिझ्झा-बर्गरची ट्रिट

उपनगरीय रेल्वे स्टेशनचं रुप आता पालटणार आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Pizza burgers will sold at Railway station : उपनगरीय रेल्वे स्टेशनचं रुप आता पालटणार आहे. रेल्वे बोर्डाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने प्रीमियम ब्रँड केटरिंग आउटलेट्स ही स्टॉल्सची नवी श्रेणी मंजूर केली आहे. त्यामुळे आता लोकप्रिय खाद्यपदार्थांची साखळी रेल्वे स्थानकावर दिसणार आहे.

रेल्वे स्थानकावर पिझ्झा-बर्गर (Railway Station)

उपनगरीय रेल्वे स्टेशनवर आता पिझ्जा, बर्गर, फ्रेंच फ्राईजसारखे खाद्यपदार्थ विक्रीस उपलब्ध असणार आहे, रेल्वे बोर्डाच्या नव्या निर्णयावरुन आता प्रचलित खाद्यपदार्थाच्या कंपन्यांना त्यांचे कॅफे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावर सध्या तीन प्रकारचे स्टॉल्स आहे. यामध्ये दुधाचे पदार्थ, फळांचा रस, चहा-बिस्कीटं, सामोसा-वडा यांचा समावेश आहे. हे सर्व पदार्थ रेल्वेने ठरवून दिलेल्या प्रमाणात आणि किमतीत विकल्या जातात. मात्र आता नव्या श्रेणीमध्ये कंपनीला त्यांच्या किमतीत आणि ते ठरवतील त्यानुसार खाद्यपदार्थांची विक्री करण्याची परवानगी आहे.

नक्की वाचा - Emotional Video : 'मर्द को भी दर्द होता है'; बोरीवली स्थानकावरील तरुणाचा 'तो' हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ

रेल्वे प्लॅटफॉर्मवरील ९० चौरस फुटांच्या स्टॉल्सकडून एका वर्षाला ४ ते ५ लाख रुपये आकारले जातात. मात्र प्रीमियन कॅटरिंग स्टॉल्ससाठी जागा जास्त देण्यात आली, त्यानुसार त्याच्या किमती ठरवतील. याशिवाय मुंबईतील १७ रेल्वे स्थानकांवर डेक उभारले जाणार आहे. याचा वापर व्यावसायिक कामासाठीही करता येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

Advertisement