जाहिरात

Sunburn Festival Mumbai Ticket : एका तिकिटाचे साडे 3 लाख; बुकिंग सुरू, किमती पाहून भुवया उंचावतील!

भारतातील प्रसिद्ध सनबर्न फेस्टिव्हल यंदा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.

Sunburn Festival Mumbai Ticket : एका तिकिटाचे साडे 3 लाख; बुकिंग सुरू, किमती पाहून भुवया उंचावतील!

Sunburn Festival Mumbai ticket price : भारतातील प्रसिद्ध सनबर्न फेस्टिव्हल यंदा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. आधी हा कार्यक्रम गोव्यात आयोजित केला जात होता. मात्र त्यानंतर हा कार्यक्रम पुणे आणि पहिल्यांदा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात म्युझिक टुरिझमला फायदा होईल अशी अपेक्षा महाराष्ट्र सरकारकडून व्यक्त केली जात आहे. 

सनबर्न फेस्टिव्हल कधी अन् कुठे असेल?

सनबर्न फेस्टिव्हल १९ ते २१ डिसेंबर २०२५ या दरम्यान मुंबईतील शिवडी येथे आयोजित करण्यात आला आहे. शिवडी येथील इन्फिनिटी बे येथे हा महोत्सव होणार आहे.

तिकीट बुक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बुक माय शो - सनबर्न तिकीट

Sunburn Festival : यंदा मुंबईत होणार 'सनबर्न फेस्टिव्हल', तारखा जाहीर; कुठे असेल कार्यक्रम?

नक्की वाचा - Sunburn Festival : यंदा मुंबईत होणार 'सनबर्न फेस्टिव्हल', तारखा जाहीर; कुठे असेल कार्यक्रम?

सनबर्नचं सर्वात महागडं तिकीट...

सनबर्न फेस्टिव्हलच्या तीन दिवसांचं सर्वात महागड तिकीट (Gold Table - Festival) ३ लाख ५४ लाख इतकं आहे. हा पास तीन दिवसांसाठी असेल. यामध्ये कॉकटेल टेबल, कार पार्किंग, बिअर, व्हिस्की यासांरख्या सुविधा असतील. 

दुसरं सर्वात महागडं तीन दिवसांचं (Reflections Lounger Fest) तिकीट ६० हजार इतकं  आहे. यानंतर चा पास ३५ हजार, २४ हजार, १६ हजार आहे. तीन दिवसांचा पाससाठी सर्वात कमी ९ हजार आकरले जात आहे. 

१९ आणि २० (शुक्रवार आणि शनिवार) दोन दिवसांचं तिकीट ...

पहिलं तिकीट ६ हजार, दुसरं १२ हजार तर तिसरं तिकीट १६ हजारांवर असेल. 

शुक्रवार (१९ डिसेंबर) एका दिवसाचं तिकीट ...

३ हजारापासून ते १ लाख ४१ हजारांपर्यंत 

शनिवार (२० डिसेंबर ) दुसऱ्या दिवसाचं तिकीट...

४ हजारांपासून ते १ लाख ७७ हजारांपर्यंत

रविवार (२१ डिसेंबर) - 

३५०० पासून १ लाख ४१ हजारांपर्यंत

Listen to the latest songs, only on JioSaavn.com