Sunburn Festival in Mumbai : तरुणांचं आकर्षण ठरलेला 'सनबर्न फेस्टिव्हल' पहिल्यांदाच मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने या महोत्सवाला परवानगी दिली आहे. सनबर्न फेस्टिवलला मुंबईत परवानगी मिळाली आहे आणि हा महोत्सव १९ ते २१ डिसेंबर २०२५ या काळात आयोजित केला जाणार आहे. हा उत्सव पहिल्यांदाच मुंबईत होत आहे आणि तो गोवा येथून हलवण्यात आला आहे. हा आशियातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (EDM) महोत्सव आहे
सनबर्न फेस्टिव्हल कुठे असेल?
सनबर्न फेस्टिव्हल १९ ते २१ डिसेंबर दरम्यान मुंबईतील शिवडी येथे आयोजित करण्यात आला आहे. शिवडी येथील इन्फिनिटी बे येथे हा महोत्सव होणार आहे. २०१६ मध्ये पुण्यात आयोजित 'सनबर्न फेस्टिव्हल'मध्ये सनबर्नने सरकारला ४२ लाख ७९ हजार ५८३ रुपयांचे मुद्रांक शुल्काचे नुकसान केले होते. तसेच, या कार्यक्रमासाठी गौण खनिजांच्या बेकायदेशीर उत्खननामुळे राज्य सरकारला ६० लाख ५२ हजार ३८३ रुपयांचा महसूल वसूल करता आलेला नाही.
नक्की वाचा - भारतातील 400 विमानांना मोठा फटका, इंडिगोचं सर्वात जास्त नुकसान, 'Air India'ची 113 विमानंही..काय घडलंय?
यंदा काय असेल खास?
सनबर्न फेस्टिव्हल १९, २० आणि २१ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या वर्षी सनबर्न फेस्टिव्हलला DJ Mag च्या टॉप १०० फेस्टिव्हल्स ऑफ २०२५ लिस्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. ही यादी आठव्या स्थानावर आहे. DJ Mag हे एक प्रसिद्ध मॅगझिन आहे, जो जगातील सर्वोत्कृष्ट फेस्टिव्हलची यादी जाहीर करते.
सनबर्नचे सीईओ करण सिंह म्हणाले, महाराष्ट्र सरकारने मुंबईला भारताची फेस्टिव्हल कॅपिटल म्हणून ओळख मिळविण्यास मदत केली आहे. या वर्षी महोत्सवात एक वेगळाच उत्साह आहे. २००७ पासून, मार्टिन गॅरिक्स, स्क्रिलेक्स, स्वीडिश हाऊस माफिया, अॅलन वॉकर, आर्मिन व्हॅन बुरेन, डीजे स्नेक, टिएस्टो, द चेनस्मोकर्स, डेव्हिड गेट्टा आणि हार्डवेल यांसारख्या प्रमुख कलाकारांनी सनबर्न रंगमंचावर सादरीकरण केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
