रेवती हिंगवे, पुणे
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली आहे. "आपली बायकोच्या गाडीत बंदूक ठेऊ शकतो, अशा माणसाबरोबरच काम करणे शक्य नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांचे नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली. राज्यातील महायुतीच्या कारभारावरे देखील सुप्रिया सुळेंना टीका केली. पहिल्या 100 दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे, असा दावा देखील सुप्रिया सुळे यांनी केलाआहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता म्हटलं की, "महाराष्ट्रात कृषी खात्यात भ्रष्ट्राचार झाला. याचा उल्लेख जितेंद्र आव्हाडांनी केला, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे यांनी केला. मी सर्वांना विनंती करेन संतोष देशमुखांना आईला भेटा, महादेव मुंडेच्या कुटुबीयांना भेटा, त्यांचे अश्रू दिसतील. काय चूक होती त्यांनी. माझ्या लेकराची चूक काय असं मला त्यांनी विचारलं. मला कधीकधी वाटतं बरं झाला पक्ष फुटला."
(नक्की वाचा- Pune Politics : पुण्यात काँग्रेसला खिंडार; रविंद्र धंगेकरानंतर जवळपास 100 पदाधिकारी पक्ष सोडणार)
"पक्षात असतानाही माझी त्यांच्याशी लढाई"
"कारण ते आणि मी या पक्षात असते तर काम करणे कठीण झालं असतं. त्यामुळे पक्षात एकतर ते राहिले असते किंवा मी राहिले असते. मी त्या पक्षात कामच करु शकले नसते. सर्वांना माहिती आहे, पक्षात असतानाही माझी त्यांच्याशी लढाई होती. मी कधी हे बाहेर बोलले नाही मात्र आज संघटनेत बसले म्हणून सांगते. आपली बायको, आपल्या मुलांच्या आईच्या गाडीत बंदूक ठेवली. अशा व्यक्तीसोबत काम करुच शकत नाही. तेव्हापासून लढाई सुरु झाली होती. मी कुणाला घाबरत नाही", अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.
"संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांची घरी भेट दिल्यानंतर तुम्हाला काय परिस्थिती आहे हे कळेल. मला मिळालेल्या माहितीनुसार आणखी एक रिपोर्ट बाहेर आला आहे. त्यामध्ये देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना फोन आले होते. त्यांची हे गंमत बघत होते. अवादा कंपनीला काम देऊ नये, म्हणून एका गृहस्थाने केंद्र सरकारला तीन पत्र दिली आहेत. पत्रही यांनीच द्यायची, खंडणीही यांची गोळा करायची, या हक्काचा आका तोच आहे", असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Narendra Modi: गोधरा दंगलीबाबत मोदी थेट बोलले, फ्रिडमन यांच्या मॅराथॉन पॉडकास्टमध्ये मोठे खुलासे)
"सहा महिन्यात दुसरी विकेट जाणार"
महायुती सरकारच्या कारभारावर देखील सुप्रिया सुळे यांनी टीका केली. "महायुती सरकारच्या 100 दिवसात एक विकेट गेली. आता सहा महिन्यात आणखी एकाची विकेट जाणार. त्याचे नाव आताच जाहीर करणे योग्य नाही. मात्र बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. हिंमत असेल, तर समोर येऊन लढ. ही लढाई खूप मोठी आहे. छोट्यांना घेरण्यापेक्षा जे डेंजर आहेत, त्यांच्याशी लढण्यात मजा आहे."