जाहिरात

Pune Politics : पुण्यात काँग्रेसला खिंडार; रविंद्र धंगेकरानंतर जवळपास 100 पदाधिकारी पक्ष सोडणार

Pune Political News : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील पदाधिकारी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करताना राज्यभर दिसून येत आहेत. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अथवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होत आहेत.

Pune Politics : पुण्यात काँग्रेसला खिंडार; रविंद्र धंगेकरानंतर जवळपास 100 पदाधिकारी पक्ष सोडणार

रेवती हिंगवे, पुणे

राज्यभर सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहत आहेत. त्यात पुणे देखील मागे राहिलेले नाही. पुण्यातील काँग्रेसचा माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. धंगेकरांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसला पुण्यात धक्का बसला होता. मात्र पुण्यात काँग्रेसला आणखी हादरे बसले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रविंद्र धंगेकरांनंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील व एनएसयुआय पुणे सरचिटणीस कृष्णा साठे यांच्यासह पक्षातील अन्य 100 पदाधिकारी पक्ष सोडणार आहेत. येत्या 2-3 दिवसात पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ट्रेंडिंग बातमी - Narendra Modi: गोधरा दंगलीबाबत मोदी थेट बोलले, फ्रिडमन यांच्या मॅराथॉन पॉडकास्टमध्ये मोठे खुलासे

गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील पदाधिकारी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करताना राज्यभर दिसून येत आहेत. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अथवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरवसे पाटील हे काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार अशी बातमी समोर आली होती. 

ट्रेंडिंग बातमी - Pune Maitri Club: वय वर्ष 60 तरी ही बांधली जातेय लग्नगाठ, 'त्या' 90 जणांची अनोखी कहाणी

आता पक्षप्रवेशाची तारीख निश्चित झाली असून, येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सुरवसे पाटलांसह युवक काँग्रेसचे 100 पदाधिकारी राजीनामा देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार येत्या आठवड्यात या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: