तानाची सावंत यांच्या सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून गोळी सुटून एकजण जखमी

सुरक्षारक्षक नितीन शिर्के रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन ते बॅगेत कपाटात ठेवले होते. मुलाचा धक्का लागून बॅग खाली पडली व गोळी सुटून 13 वर्षाच्या मुलाच्या पायाला लागून तो जबर जखमी झाला आहे. अभय शिर्के असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षारक्षकाच्या रिव्हॉल्वरमधून गोळी सुटून एकजण जखमी झाला आहे. तानाजी सावंत यांच्या धनकवडी येथील बंगल्यावर काम करणार्‍या सुरक्षा रक्षकाच्या घरी एक घटना घडली आहे. यामध्ये सुरक्षारक्षकाच्या मुलाच्या पायाला गोळी लागली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुरक्षारक्षक नितीन शिर्के रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन ते बॅगेत कपाटात ठेवले होते. मुलाचा धक्का लागून बॅग खाली पडली व गोळी सुटून 13 वर्षाच्या मुलाच्या पायाला लागून तो जबर जखमी झाला आहे. अभय शिर्के असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. 

याबाबत पोलीस हवालदार हेमंत राऊत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन हनुमंत शिर्के (वय 40) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नितीन शिर्के हे मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडीतील बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर आहे. त्यांनी आपल्या परवाना धारी रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन कसलीही खबरदारी न घेता रिव्हॉल्व्हर असलेली बॅग कपाटात ठेवली. 

( नक्की वाचा : Viral Video : जेवणात लघवी मिसळत होती मोलकरीण, व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून उघड झालं सत्य )

त्यांचा मुलगा अभय शिर्के याने कपडे घालण्यासाठी कपाट उघडले. त्यावेळी धक्का लागून कपाटातील रिव्हॉल्व्हर असलेली बॅग खाली पडून त्यातून गोळी सुटली. ती अभय याच्या उजव्या पायाच्या पोटरीला लागून तो जबर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

Topics mentioned in this article