जाहिरात

Mumbai-Pune Expressway : मध्यरात्री 2.30 वाजता तन्वीर मदतीला उभा राहिला; अशी रोखली टँकरमधील गॅस गळती

टँकर गळती रोखण्यासाठी प्रशासनाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात होते. प्रोपलिन गॅस धोकादायक असल्याने प्रशासनाकडून अधिक काळजी घेतली जात होती.

Mumbai-Pune Expressway : मध्यरात्री 2.30 वाजता तन्वीर मदतीला उभा राहिला; अशी रोखली टँकरमधील गॅस गळती

मेहबूब जमादार, प्रतिनिधी

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ३ फेब्रुवारी रोजी खोपोली हद्दीत टँकरचा अपघात झाला होता. यामुळे प्रवाशांचा तब्बल ३६ तास खोळंबा झाला होता. प्रोपलिन गॅसने भरलेला टँकर पलटल्याने मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. प्रवाशांना तासन् तास गाडीत बसून राहावं लागलं. महिलांना तर मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. 

टँकर गळती रोखण्यासाठी प्रशासनाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात होते. प्रोपलिन गॅस धोकादायक असल्याने प्रशासनाकडून अधिक काळजी घेतली जात होती. त्यामुळे पलटी झालेला टँकर हटविण्यासाठी अधिक वेळ लागत होता. ३-४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री गॅस टँकरची गळती थांबविण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात होते. शेवटी लाकडाची खुट्टी तयार करून ही गळती रोखण्यात आली होती. विशेष म्हणजे यासाठी खोपोलीतील तन्वीर मुल्ला याने मध्यरात्री खुट्टी तयार करुन दिली होती. 

नक्की वाचा - Mumbai Pune Expressway: 6500 कोटी खर्चूनही 36 तासांची महाकोंडी!एक्स्प्रेसवेवर नक्की काय बिनसलंय?


तन्वीर मुल्लाने घेतला पुढाकार

जिथं गॅस गळती होत आहे तिथं लाकडाची खुट्टी खोचल्यास गळती बंद होण्यास मदत होते. हे लक्षात येताच ३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री खुट्टी बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या दिवशी मुस्लिमांचा महत्त्वाचा दिवस होता. ( बडी रातला मुस्लीम धर्मीय मशिदीमध्ये जागरण करतात) मात्र असं असतानाही तन्वीर मुल्लाने पुढाकार घेतला. तन्वीर मुल्लाने खालापूर तालुक्यातील इसंबा फाटा येथील त्यांच्या वर्कशॉप येथे रात्री २.३० वाजता अवघ्या ४५ मिनिटात चार लाकडी खुट्टया विना मोबदला बनवून दिल्या. अनेक अनोळखी हातांनी आपत्कालीन परिस्थितीत मदत केली.  तन्वीर हा त्यापैकी एक उदाहरण. तन्वीरने रात्रीतून स्वत:ची सर्व कामं बाजूला ठेऊन चार लाकडी खुंट्या तयार करून दिल्या. याशिवाय पीओपी बँडेज आणि पीओपी स्पेशल सिमेंटमुळे गळती थांबण्यास मदत झाली. खोपोली शीळफाटा येथील असिफ पटेल आणि अमोल ठकेकर यांनीही आपलं दैनंदिन काम बाजूला ठेऊन तत्काळ मदत उपलब्ध करून दिली.  


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com