Navi Mumbai : लोन रिकव्हरी एजन्ट्सचा जाच; शिक्षकाने अटल सेतूवरून उडी घेत संपवलं जीवन

Loan Recovery Agents : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शिक्षक 12 हजार रुपयांची थकबाकी परत करू शकला नाही, त्यामुळे आठवडाभरापासून लोन रिकव्हरी एजंट त्यांना पैशांसाठी तगादा लावत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

लोन रिकव्हरी एंजन्ट्सच्या जाचाला कंटाळून अलिबाग येथील एका 50 वर्षीय शिक्षकाने आयुष्य संपवलं आहे. शिक्षकाने शुक्रवारी सकाळी उलवे जवळील अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. इन्स्टंट लोन अ‍ॅप कंपनीकडून घेतलेल्या लोनच्या वसुलीसाठी त्रास दिला जात असल्याने पीडित शिक्षकाने हे पाऊल उचललं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शिक्षक 12 हजार रुपयांची थकबाकी परत करू शकला नाही, त्यामुळे आठवडाभरापासून लोन रिकव्हरी एजंट त्यांना पैशांसाठी तगादा लावत होते. रिकव्हरी एजंटने शिक्षकाचे मॉर्फ केलेले नग्न फोटो त्याच्या संपर्कातील व्यक्ती आणि व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पाठवल्याचा आरोप आहे.

(नक्की वाचा- Panvel News: मधमाशांनी घात केला; कर्नाळा किल्ला फिरायला गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू)

शिक्षकाच्या कुटुंबातील सदस्यांनी असा दावा केला आहे की, गावकऱ्यांकडून घेतलेले वैयक्तिक कर्ज फेडण्यासाठी त्यांनी गेल्या महिन्यात इन्स्टंट लोन अॅपवरून कर्ज घेतले होते. मात्र अॅप लोन फेडू न शकल्याने त्यांना वसुलीसाठी फोन येऊ लागले. कर्ज न भरल्यास बदनामी करण्याची धमकी त्यांना दिली जात होती. शिक्षकाने तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला. मात्र शाळा आणि परिसरात अपमानाची भीती त्यांना वाटली.

सततच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाने टोकाचा निर्णय घेतला. त्यासाठी ते शनिवारी सकाळी 9 वाजता उरण येथील अटल सेतू येथे पोहोचले. ते त्यांच्या गाडीतून उतरले पुलावरुन खाली उडी मारली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद होताच, पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने, त्यांचा मृतदेह सुमारे 12 किमी अंतरावर आढळला. 

Advertisement

(नक्की वाचा - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकाच्या कुटुंबियांना तक्रार दाखल करण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे. शिक्षकाच्या नातेवाईकांनी अद्याप लोन अॅप कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही.

Topics mentioned in this article