संजय तिवारी, नागपूर
Nagpur News : शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्यातक सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अखेर शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह दोघांना निलंबित करण्यात आलं आहे. नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आरोपींच्या अटकेच्या 15 दिवसानंतर हे निलंबनाचे आदेश निघाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बोगस मुख्यध्यापक भरती शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक नीलेश मेश्राम यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अटेकनंतर 48 तासात कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र 15 दिवस लोटल्यावर ही कारवाई करण्यात आली.
(नक्की वाचा- Kashmir Zipline Video : 7 मिनिटांच्या अंतराने वाचलो, हल्ल्यावेळी झिपलाइन व्हिडिओ करणाऱ्या ऋषि भट्टचा धक्कादायक अनुभव)
या सोबतच उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक संजय बोदाडकर यांच्याही निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत. उपसंचालक कार्यालयातील दीपेंद्र लोखंडे यांच्याकडे उल्हास नरड यांचा शिक्षण उपसंचालक पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. तर मेश्राम यांचा प्रभार हरडे यांच्याकडे देण्यात आला. प्राथमिक शिक्षण विभागाचे वेतन पथक अधीक्षक पदाचा अतिरिक्त प्रभार गौतम गेडाम यांच्याकडे देण्यात आला.