करार संपला म्हणून घर सोडण्यास सांगितलं; भाडेकरुचा घर मालकिणीच्या बहिणीवर हल्ला

अंबरनाथच्या पालेगाव परिसरारील रिलायन्स रेसिडेन्सी संकुलात उर्मिला जगताप आणि त्यांची बहीण अर्चना जगताप यांचे फ्लॅट्स आहेत. उर्मिला या याच संकुलात वास्तव्याला असून त्यांच्या बहिणीचा फ्लॅट मॉन्टी भरोडिया यांना भाड्याने दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

निनाद करमरकर, अंबरनाथ

भाडेकरार संपल्यावर घर सोडण्यास सांगितल्यानं भाडेकरूने घर मालकिणीच्या बहिणीवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.  अंबरनाथमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मारहाण, विनयभंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अंबरनाथच्या पालेगाव परिसरारील रिलायन्स रेसिडेन्सी संकुलात उर्मिला जगताप आणि त्यांची बहीण अर्चना जगताप यांचे फ्लॅट्स आहेत. उर्मिला या याच संकुलात वास्तव्याला असून त्यांच्या बहिणीचा फ्लॅट मॉन्टी भरोडिया यांना भाड्याने दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात भाडेकरार संपल्यानं उर्मिला यांनी मॉन्टी यांना फ्लॅट सोडण्यास सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - अतुल सुभाषवर जज हसत होते, काकांनी सांगितला तो किस्सा, मृत्यूनंतर पत्नीची आई-भाऊ फरार?

मात्र यावरून त्यांच्यात वाद होऊन झटापटी झाली. त्यानंतर काही वेळाने मॉन्टी हे काही लोकांना घेऊन पुन्हा उर्मिला यांच्या घरी गेले आणि तिथे उर्मिला यांच्यासह त्यांच्या दोन लहान मुलांनाही मारहाण केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड करत महापुरुषांच्या फोटोंचीही विटंबना केली. 

या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेलेल्या उर्मिला यांची पोलिसांनी तीन दिवस तक्रार न घेता त्यांना चकरा मारायला लावल्या, असा उर्मिला यांचा आरोप आहे. अखेर बुद्धिस्ट फोरमच्या सदस्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - खेळता खेळता खाली कोसळली, जीवानिशी गेली, 15 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत काय झालं?

मॉन्टी याच्यासह त्याची पत्नी, भाऊ, सासू, 8 ते 9 महिला, 4 पुरुष यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये मारहाण, विनयभंग, अॅट्रोसिटी यासह एकूण 14 कलम लावण्यात आले आहेत. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तक्रारदार उर्मिला जगताप यांनी केली आहे.

Topics mentioned in this article