सातारा शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सातारा शहरातील कन्या शाळेमध्ये दहावीमध्ये शिकत असलेल्या मुलीचा खेळताना पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कन्या शाळा यादोगोपाळ पेठ या ठिकाणी ही विद्यार्थीना इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. अक्षदा देशमुख असं या विद्यार्थीनीचे नाव असून ती 15 वर्षाची होती. अशी माहिती शाहूपुरी पोलीसांनी दिली आहे. शाळेत कबड्डी खेळ असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अक्षदा देशमुख ही शाळेत कबड्डी खेळत होती. खेळतानाचा ती डोक्यावर जोरात आपटली. त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी पाटील यांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर या प्रकरणी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली आहे. या मुलीचे पोस्टमार्टम केल्यानंतर डोक्यास जोराचा मार लागल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे मत आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करत आहेत.
मात्र या प्रकरणातील दुसरी बाजू ही समोर आली आहे. कन्या शाळेमध्ये अक्षदाचा खेळताना पडून मृत्यू झाला. मात्र ती पडल्यानंतर तिला तातडीने उपचार मिळाले नाहीत अशी चर्चा आहे. उपचारा अभावी तिला जीव गमावा लागला असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ती खेळताना जेव्हा पडली, तेव्हा तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र शाळेतील शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थिनीला काही काळ शाळेच्या आवारातच बसून ठेवण्यात आले. यावेळी तिची प्रकृती गंभीर झाली.
ज्यावेळी तिची प्रकृती बिघडू लागली. त्यावेळी शिक्षकांनी हालचाल केली. तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तो पर्यंत बराच उशीर झाला होता. रूग्णालयात पोहोचेपर्यंत तिचा जिव गेला होता. तिला उशिरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्या मृत्यूला शालेय प्रशासन जबाबदार असल्याचीही पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र विद्यार्थिनीच्या मृत्यूने शाळा प्रशासन पुर्ण पणे हादरून गेले आहे. शिवाय विद्यार्थ्यांमध्येही भितीचे वातावरण आहे. खेळता खेळता मृत्यू ओढवल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world