जाहिरात

Thane News : ठाणेकरांवर मोठं संकट! 'या' दिवशी पाण्यासाठी करावी लागणार वणवण, वाचा सर्व डिटेल्स

ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलवाहिनीचे काम सुरू असल्याने काही भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.

Thane News : ठाणेकरांवर मोठं संकट! 'या' दिवशी पाण्यासाठी करावी लागणार वणवण, वाचा सर्व डिटेल्स
Thane Water Cut News
मुंबई:

Thane Water Cut News : ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलवाहिनीचे काम सुरू असल्याने काही भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. या कामादरम्यान खोदाई करताना जलकुंभाच्या 600 मिमी व्यासाच्या आउटलेट जलवाहिनीला बाधा येत असल्याने ती जलवाहिनी स्थलांतरित करणे आवश्यक आहे. या कामासाठी गुरूवारी 12 मार्चपासून सकाळी 9 ते शुक्रवारी 13 मार्चला सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

कोणत्या भागात राहणार पाणीपुरवठा बंद?

या कालावधीत उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील सिद्धेश्वर तलाव परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी, पाचपाखाडी, सरोवर दर्शन, चंदनवाडी, हंसनगर, सिंगनगर, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलार पाडा, गोकुळदासवाडी, कोलबाड, गोकुळनगर परिसर तसेच नौपाडा प्रभाग क्षेत्रातील पाचपाखाडी, चंदनवाडी, महापालिका परिसर, चरई, धोबीआळी आदी भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

नक्की वाचा >> Navi Mumbai : नवी मुंबईतील दस्त नोंदणी घोटाळ्यात सर्वात मोठी अपडेट, बड्या एजंटसह सरकारी अधिकाऱ्यावर कारवाई

नागरिकांनी पाणीकपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे  महापालिकेस सहकार्य करावे,असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. ठाण्यात पाणी टंचाईच्या समस्येमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वीही पाणी कपातीची समस्या निर्माण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे काही भागातील नागरिकांनी महापालिकेच्या कामकाजा विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. पाण्याच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील, त्या महापाकिलेनं तातडीनं सोडवाव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com