जाहिरात

Thane Railway Station: ठाणे स्थानकातील अस्वच्छ स्टॉल सील, 15 हजार रुपयांचा दंडही

ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जवळ असलेल्या प्रतीक्षागृहातील बहुउद्देशीय स्टॉलवर अस्वच्छता आढळल्याने मध्य रेल्वेने कडक कारवाई केली आहे. प्रवाशांच्या तक्रारींनंतर DRUCC सदस्यांनी केलेल्या पाहणीत अस्वच्छतेचे वास्तव समोर आले.

Thane Railway Station: ठाणे स्थानकातील अस्वच्छ स्टॉल सील, 15 हजार रुपयांचा दंडही

Thane News: ठाणे रेल्वे स्थानकातील एका स्टॉल कंत्राटदारावर मध्य रेल्वेने मोठी कारवाई केली आहे. स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जवळ असलेल्या प्रतीक्षागृह परिसरात चालवल्या जाणाऱ्या बहुउद्देशीय स्टॉलवर प्रचंड अस्वच्छता असल्याचे उघडकीस आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा स्टॉल तात्पुरता सील केला आहे. या प्रकरणी कंत्राटदारावर 15,000 चा दंड ठोठावण्यात आला असून, स्टॉलचे कामकाज पुढील 7 दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रवाशांच्या तक्रारी अन् DRUCC कडून प्रत्यक्ष पाहणी

ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जवळ असलेल्या या स्टॉलवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि तेथील अस्वच्छतेबाबत प्रवाशांकडून सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी येत होत्या. या तक्रारींची दखल घेत विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीच्या सदस्यांनी नुकतीच या स्टॉलची अचानक पाहणी केली. पाहणीदरम्यान प्रवाशांनी केलेल्या तक्रारी पूर्णपणे सत्य असल्याचे आढळून आले. स्टॉल परिसरात स्वच्छतेच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन केले जात असल्याचे समोर आल्यानंतर समितीने कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची शिफारस केली होती.

(नक्की वाचा-  Virar News: चिमुकलीवरून सासरे आणि सुनेमध्ये जोरदार वाद; रागाच्या भरात पुढे भयंकर घडलं)

7 दिवस स्टॉल बंद अन् दंडात्मक कारवाई

तक्रारींची आणि पाहणी अहवालाची पडताळणी केल्यानंतर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी या स्टॉलवर थेट सील ठोकले.  स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंत्राटदाराला 15,000 चा दंड करण्यात आला आहे. हा स्टॉल पुढील 7 दिवस पूर्णपणे बंद राहील. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

(नक्की वाचा-  Rain News: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्याना 'रेड अलर्ट'; दोन जिल्ह्यांत शाळांना सुट्टी जाहीर)

अस्वच्छतेबाबत 'झिरो टॉलरन्स' धोरण; रेल्वेचे आवाहन

या कारवाईनंतर मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे की, रेल्वे आवारात चालवल्या जाणाऱ्या कॅटरिंग आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये अस्वच्छतेबाबत 'झिरो टॉलरन्स' धोरण राबवले जात आहे. रेल्वे स्थानकांवर अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता मानकांचे कडक पालन व्हावे, यासाठी सर्व स्थानकांवर नियमित तपासणी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच प्रवाशांना अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता किंवा इतर सुविधांबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी तात्काळ 'रेल मदती' पोर्टलमार्फत तक्रार नोंदवावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com