Thane News: ठाणे–घोडबंदर राज्यमार्गावरील गायमुख घाटभागात मिरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत रस्ता डांबरीकरण व सुधारणा काम हाती घेण्यात आले आहे. हे काम 11 ऑक्टोबर रात्री 10 वाजेपासून 14 ऑक्टोबर रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात जड व अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पालघर–विरारकडून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना शिरसाट फाटा–अकलोली–अंबाडी मार्गे, तर वसई बाजूकडील वाहनांना चिंचोटी–भिवंडी मार्गे वळवण्यात येईल. ठाणे किंवा मुंबईकडून येणाऱ्या जड वाहनांना वाय जंक्शनपासून प्रवेशबंदी राहील. हलक्या वाहनांना व अत्यावश्यक सेवेतील वाहनाना या मार्गाने ये-जा करण्यास परवानगी आहे.
(नक्की वाचा- Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर 4 दिवसांचा मेगाब्लॉक! लोकल बंद, एक्सप्रेस रद्द, वाचा सर्व डिटेल्स)
हलकी व अत्यावश्यक सेवा वाहने मात्र या मार्गावरून चालू राहतील. वाहनचालकांनी अधिसूचनेचे काटेकोर पालन न केल्यास त्याचप्रमाणे, महामार्ग पोलीस आणि मिरा भाईंदर आयुक्तालायच्या वाहतूक पोलिसांनी सतर्क राहून वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित न केल्यास मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसू शकतो.
वाहतुकीचे पर्याची मार्ग
- पालघर–विरार बाजूकडून येणारी वाहने: शिरसाट फाटा- पारोळ - अकलोली (गणेशपुरी) - अंबाडी मार्गे प्रवास करावा.
- पालघर–वसई बाजूकडून येणारी वाहने: चिंचोटी - कामन - खारबांव - अंजूरफाटा - भिवंडी मार्गे प्रवास करावा.
- पश्चिम द्रुतगतीमार्ग (मुंबई / काशिमीरा) कडून येणारी वाहने: वर्सोवा ब्रिज - गुजरात महामार्ग - शिरसाट फाटा / चिंचोटी मार्गे प्रवास करावा.
- ठाणे / मुंबई कडून येणारी जड अवजड वाहने: वाय जंक्शन / कापुरबावडी येथे प्रवेश बंद करण्यात येईल. पर्यायी मार्ग: खारेगाव टोलनाका - मानकोली - अंजूरफाटा मार्गे प्रवास करावा.