Thane News: ठाणेकरांची चिंता वाढली! 3 दिवसांत 6 मुले गायब, नेमकं काय घडतंय?

Thane News: ठाणे शहरात गेल्या तीन दिवसांत 4 मुलींसह 6 अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुंब्रा, वागळे इस्टेट आणि घोडबंदर रोड परिसरातून ही मुले बेपत्ता झाली आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

रिझवान शेख, ठाणे

Thane News: ठाणे शहरात अल्पवयीन मुले आणि मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 72 तासांत शहरातील विविध भागांतून 4 मुली आणि 2 मुले अचानक बेपत्ता झाली आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांची विशेष पथके या मुलांचा शोध घेत आहेत.

मुंब्र्यात सर्वाधिक घटना

बेपत्ता झालेल्यांमध्ये मुंब्रा परिसरातील मुलांची संख्या जास्त आहे. संतोषनगर, मुंब्रा येतून  25 एप्रिल रोजी रात्री 8 च्या सुमारास एक 13 वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर अमृतनगर, मुंब्रा येथून 26 एप्रिल रोजी पहाटे एका 17 वर्षीय मुलीने कोणालाही न सांगता घर सोडले, ती अद्याप घरी परतलेली नाही.

Advertisement

(नक्की वाचा-  VIDEO: पुण्यात वसुलीवरून राडा! हडपसरमध्ये भररस्त्यात एजंट आणि ग्राहकाची हाणामारी)

वागळे इस्टेट आणि किसन नगरमधील स्थिती

वागळे इस्टेट आणि किसन नगर परिसरातूनही मुले बेपत्ता होण्याचे प्रकार घडले आहेत. किसन नगर 2 येथून 25 एप्रिल रोजी सायंकाळी 16 वर्षीय मुलगी "मैत्रिणीकडे जाते" असे सांगून घरून निघाली आणि परतलीच नाही. रुपादेवी पाडा येथे याच दिवशी सायंकाळी 15 वर्षीय मुलगी घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. ठाणे पश्चिम (होतकरू मैदान) 23 एप्रिल रोजी 14 वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाला असून त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. घोडबंदर रोड 23 एप्रिलच्या मध्यरात्री 16 वर्षीय मुलगी घरातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

(नक्की वाचा- Pune News: पुणे हादरलं! दारूच्या नशेत चोरली PMPML बस आणि सुसाट सुटला; FC रोडवर हजारो जीव टांगणीला)

पालकांना आवाहन

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास पोलीस थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करतात. ठाणे पोलिसांनी सर्व रेल्वे स्थानके, बस डेपो आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या सोशल मीडिया वापराकडे आणि मित्रमंडळींकडे लक्ष देणे गरजेचे आहे," असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने मुले बेपत्ता होण्यामागे एखादे रॅकेट सक्रिय आहे का, की मुले घरगुती कारणांमुळे किंवा सोशल मीडियाच्या प्रभावामुळे घर सोडून जात आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
 

Topics mentioned in this article