जाहिरात

Thane News: '10 कोटी दे नाही तर मरण्यास तयार रहा', शिंदेंच्या ठाण्यात बिष्णोई गँगची दहशत? धमकी कुणाला?

तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Thane News: '10 कोटी दे नाही तर मरण्यास तयार रहा', शिंदेंच्या ठाण्यात बिष्णोई गँगची दहशत? धमकी कुणाला?
  • बिष्णोई गँगने ठाण्यातील एक नामांकित बांधकाम व्यावसायिकाला दहशतीत ठेवून दहा कोटींची खंडणी मागितली आहे
  • व्यावसायिकाला मध्य प्रदेशात धार्मिक कार्यक्रमादरम्यान व्हॉट्सॲपवरून धमकावण्यात आले
  • खंडणीखोरांनी व्यावसायिकाला आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून ऑडिओ क्लिपद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
ठाणे:

बिष्णोई गँगने आधी मुंबईत बॉलिवूडला आपल्या रडारवर घेतले होते. त्याच्या या कारनाम्यांची चर्चा सुरू असताना त्याने मुंबई शेजारील ठाण्यात ही आता खंडणीसाठी आपले हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे.   ठाण्यातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला बिष्णोई गँगचे नाव घेवून खंडणी मागण्यात आली आहे. या बांधकाम व्यावसायिक 60 वर्षाचा आहे. 10 कोटींची खंडणी दे नाही तर मरायला तयार रहा अशी धमकी देण्यात आली आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार बांधकाम व्यावसायिक 11 फेब्रुवारीला मध्य प्रदेशात एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते.  त्यावेळी तिथेच  त्यांना व्हॉट्सॲपवर धमकीचे फोन आले. फोन करणाऱ्याने आपण 'बिष्णोई ग्रुप'चे सदस्य असल्याचे सांगितले. शिवाय 10 कोटींची मागणी ही केली. "पैसे न दिल्यास मरण्यासाठी तयार राहा," अशी धमकीही त्याने दिली. विशेष म्हणजे, "तू हवा तर हा कॉल रेकॉर्ड करून पोलिसांना दे," असे आव्हानही त्याने व्यावसायिकाला दिले. त्यामुळे व्यावसायिकाचं ही टेन्शन वाढलं. त्यांनी तातडीने मध्य प्रदेश सोडलं. तिथून ते ठाण्याला आपल्या घरी आले. 

नक्की वाचा - Latur News: शिक्षकाचे 'ते' भयंकर कृत्य, विद्यार्थ्यांमध्ये भिती, पालक चिंतेत, एकाच वेळी 30 विद्यार्थ्यांसोबत...

ठाण्यात आल्यानंतर ही त्यांचा पाठलाग या खंडणीखोरांनी सोडला नाही. 20 फेब्रुवारीला ते व्यावसायिक ठाण्यातील आपल्या कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन आला. त्यांनी फोन न उचलल्याने आरोपीने दुपारी 12:29 वाजता ऑडिओ क्लिप पाठवून पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली.याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय चंद्रनाथ महाजन यांनी सांगितले की गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिवाय  तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच अटक केली जाईल असं त्यांनी सांगितले. 

नक्की वाचा - Pune Bhigwan: 'सुट्टीच्या दिवशी प्रतिज्ञापत्र कसं बनवलं?', भिगवण प्रकरणात एक नाही तर अनेक प्रश्न?

व्यावसायिक बाहेरगावी असताना धमकीचे सत्र सुरू झाले होते. ते ठाण्यातील कार्यालयात असतानाही त्यांच्या मोबाइलवर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल आले. फोन न घेतल्याने संतापलेल्या आरोपीने ऑडिओ क्लिप पाठवून "मरण्यासाठी तयार राहा" असे म्हटले. यामुळे व्यावसायिकाचे कुटुंब आणि कर्मचारी दहशतीखाली आहेत. नौपाडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. व्हॉट्सॲप कॉल्स आणि ऑडिओ क्लिप्सच्या आधारे पोलिसांनी FIR नोंदवला आहे. खंडणीखोरांचा शोध घेण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागही कामाला लागला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही बेड्या ठोकण्यात आलेल्या नाहीत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com