Thane Station : ठाणेकरांसाठी Good News; लोकलमधील प्रवास सुखकर होणार, गर्दीवर अखेर तोडगा

भविष्यातील वाढणारी लोकसंख्या पाहता मध्य रेल्वेकडून ठाणे स्थानकात मोठा बदल करण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Central Railway News : मध्य रेल्वेतून दररोज सात ते आठ लाख प्रवासी प्रवास करीत असतात. दररोज मोठ्या संख्येने नागरिक नोकरीसाठी मुंबई उपनगरातून मुंबईच्या दिशेने प्रवास करीत असतात. त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांना दररोज मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो. ठाणे स्टेशनवर अनेक एक्सप्रेस गाड्यांचाही थांबा असतो. त्यात येथून ट्रान्सहार्बर लाइनही जोडली गेली असल्याने हे स्टेशन नेहमी गजबजलेलं असतं. त्यामुळे ठाणे स्थानकात नेहमी मोठी गर्दी पाहायला मिळते. दरम्यान मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे.

ठाण्यात 12 डब्यांच्या लोकलमध्ये वाढ करून 15 डबे (Thane local coaches will be increased) करण्यात येणार आहेत. यासाठी ठाण्यातील मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २, ३ आणि चारची लांबी वाढविण्याचं काम सुरू आहे. लोकलच्या डब्यांची संख्या वाढविल्यावर गर्दी काही प्रमाणात कमी होईल आणि प्रवाशांना निवांत प्रवास करता येईल अशी आशा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. 

नक्की वाचा - Mumbai Metro 3 Aqua Line News: मुंबई मेट्रो 3ने प्रवास करताना काय करावे आणि काय टाळावे? IMP 21 नियम जाणून घ्या

Advertisement

प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता लोकल आता 12 डब्यांच्या ऐवजी 15 डब्याची केली जाणार आहे. भविष्यातील वाढणारी लोकसंख्या पाहता मध्य रेल्वेकडून फलाट क्रमांक दोनची रुंदी 16.15 मीटर वाढण्यात येणार आहे. तर फलाट क्रमांक तीन आणि चारची रुंदी 40 मीटरने वाढण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माध्यमातून डिसेंबर 2025 पर्यंत ही काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. येणाऱ्या नवीन वर्षात ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Topics mentioned in this article