जाहिरात

Mumbai Metro 3 Aqua Line News: मुंबई मेट्रो 3ने प्रवास करताना काय करावे आणि काय टाळावे? IMP 21 नियम जाणून घ्या

Mumbai Metro-3 Aqua Line: मुंबई मेट्रो 3 अ‍ॅक्वा लाइन प्रवास करायचा असेल तर 21 नियमांची यादी माहिती असणे आवश्यक आहे.

Mumbai Metro 3 Aqua Line News: मुंबई मेट्रो 3ने प्रवास करताना काय करावे आणि काय टाळावे? IMP 21 नियम जाणून घ्या
Mumbai Metro 3 Aqua Line: मुंबई मेट्रो 3ने प्रवास करण्याआधी वाचा हे 21 नियम
Mumbai Metro 3 X

Mumbai Metro-3 Aqua Line: मुंबई मेट्रो मार्गिका 3 (Aqua Line) मुंबईकरांच्या सेवेत आल्यापासून प्रवास सुकर झालाय. अतिशय कमी वेळात प्रवाशांना त्यांचे इच्छित ठिकाण गाठता येतेय. मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ प्रचंड कमी झालाय. तुम्ही देखील प्रवास करण्यासाठी या मेट्रो लाइनचा वापर करताय का? पण तुम्हाला प्रवास करतानाचे सर्व नियम माहिती आहेत का? अ‍ॅक्वा लाइनने प्रवास करताना काय करावे आणि काय टाळावे,याचे फलक स्थानकांवर लावण्यात आले आहेत. चला तर जाणून घेऊया 21 नियमांची यादी

मुंबई मेट्रो अ‍ॅक्वा लाइन प्रवास करताना काय करू नये DONT'S

1. मेट्रो ट्रेनमध्ये खाऊ-पिऊ नका.
2. ट्रेनमध्ये प्रवेश करताना फलाटावर घाई करू नका.
3. मेट्रो परिसरात किंवा ट्रेनमध्ये कचरा टाकू नका, थुंकू नका किंवा धूम्रपान करू नका.
4. जबरदस्तीने दरवाजे उघडण्याचा किंवा फलाटावर डोकावण्याचा प्रयत्न करू नका.
5. ओव्हरहेड वायर 25000 व्होल्टने उर्जायुक्त असल्याने ट्रेनच्या छतावर उभे राहण्याचा प्रयत्न करू नका.
6. रूळावर प्रवेश करू नका.
7. मेट्रो कर्मचारी किंवा सहप्रवाशांशी गैरवर्तन करू नका.
8. बॅगेज स्कॅनिंग मशिनमधून जात नसलेली कोणतीही वस्तू जवळ बाळगू नका.
9. मेट्रो परिसरात कोणतीही ज्वलनशील वस्तू, शस्त्रे, पाळीव प्राणी, कच्चे मांस/मासे आणि जड सामान घेऊन जाऊ नका.

मुंबई मेट्रो अ‍ॅक्वा लाइन प्रवास करताना काय करावे DO'S

1. उभे असताना एस्केलेटरच्या डाव्या बाजूला राहा, चालताना एस्केलेटरच्या उजवीकडून चाला.
2. लिफ्टमधील सूचनांचे पालन करा आणि ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरजू प्रवाशांना प्राधान्य द्या.
3. तिकीट कार्यालय, ए एफ सी गेट्स आणि तिकीट विक्री यंत्राजवळ रांगेत उभे रहा.
4. आपत्कालीन परिस्थितीत मेट्रो स्टेशन रिकामे करा.
5. तुमच्याकडे असलेल्या सामानाचे वजन 25 किलोपेक्षा जास्त नसावे.
6. तुमच्या मौल्यवान वस्तू आणि इतर वस्तूंची काळजी घ्या.
7. कोणतीही संशयास्पद किंवा बेवारस वस्तू आढळल्यास मेट्रो कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा.
8. फलाटावर ट्रेनची वाट पाहताना रांगेत उभे राहा.
9. जेव्हाही विनंती केली जाईल तेव्हा तपासणीसाठी मेट्रो कर्मचाऱ्यांना QR, CSC, पेपर तिकिटे दाखवा.
10. चिन्हाचे अनुसरण करा.
11. ट्रेनमध्ये चढताना-उतरताना फलाट आणि ट्रेनच्या डब्याचे प्रवेशद्वार यामधील अंतरावर लक्ष ठेवा.
12. ज्येष्ठ नागरिक, मुले, गर्भवती महिला आणि दिव्यांग प्रवाशांना चढताना आणि उतरताना प्राधान्य द्या.

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाबाबत मोठी अपडेट; पहिल्या टप्प्यात ही 5 शहरे जोडली जाणार

(नक्की वाचा: Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाबाबत मोठी अपडेट; पहिल्या टप्प्यात ही 5 शहरे जोडली जाणार)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com