मुख्यमंत्र्यांच्या चरित्रग्रंथाचं प्रकाशन, उद्या ठाण्यात वाहतुकीच्या मार्गात मोठे बदल, कोणता रस्ता टाळाल?

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस उपआयुक्त वाहतूक विभाग यांच्या माध्यमातून ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. 

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 'योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे' (Yoddha Karmayogi Eknath Sambhaji Shinde) या पुस्तकाचं प्रकाशन उद्या 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी गडकरी रंगायतन येथे होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल सी. पी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पालकमंत्री शंभूराजे देसाई, मंत्रिमंडळातील अनेक मंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत.  

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस उपआयुक्त वाहतूक विभाग यांच्या माध्यमातून ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. 

नक्की वाचा - ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बारवर बुलडोझर फिरवा - CM शिंदे

वाहतुकीत बदल, कोणता रस्ता टाळाल?  

 पु. ना. गाडगीळ कडून ग्रिन लिफ मार्गे गडकरी सर्कल कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ब्रिन लिफ येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

सदर वाहने पु. ना. गाडगीळ चौक ग्रिन लिफ हॉटेल डॉ. मुस चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

डॉ. मुस चौक कडून गडकरी सर्कल कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साईकृपा हॉटेल ग्रिन लिफ हॉटेल येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग प्रवेश बंद सदर वाहने हटिल साईकृपा कडून एस. बी. आय कट राम मारुती रोड मार्गे इच्छित स्थळी जातील. 

डॉ. मुस चौक कडून गडकरी सर्कल कडे येणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना (बस/एसटी) यांना डॉ. मुस चौक येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

स्टेशनकडून येणारी जड अवजड (बस/एस.टी) वाहने डॉ. मुस चौक मार्गे टॉवर नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

टॉवर चौक व गडकरी सर्कल येथून डॉ. मुस चौक कडून गडकरी रंगायतन मार्गे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना गडकरी सर्कल येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

Advertisement

पर्यायी मार्ग सदर वाहने गडकरी सर्कल मार्गे दगडी शाळा अल्मेड किंवा गजानन महाराज चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.